हरे माधव परमार्थ सत्संग समितीच्या वतीने रक्तदान शिबिर.

 हरे माधव परमार्थ सत्संग समितीच्या वतीने रक्तदान शिबिर.

--------------------------------

फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

--------------------------------

गांधीनगर : विद्यमान पूर्व संत सद्गुरु बाबा ईश्वरशाह साहेबजींचे,फरमान मानव सेवा हीच ईश्वर सेवा व तोच खरा धर्म या उपदेशाला अनुसरून व सद्गुरु कृपा आशीर्वादाने हरे माधव परमार्थ सत्संग समिती माधवनगर कटनी शाखा गांधीनगर कोल्हापूर यांच्या वतीनें हरे माधव परमार्थ सत्संग भवन चिंचवाड रेल्वे फाटक जवळ गांधीनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर दि.7 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असून,या शिबिरास मंडळाचे सर्व सहकारी, सभासद, परिचय मित्रमंडळ इत्यादी या महत्त्वपूर्ण मानव कल्याणाचा उद्देश समजून

या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी घ्यावा असे आव्हान हरे माधव परमार्थ सत्संग समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



आपले फक्त दहा मिनिटांचा सहभाग दुसऱ्यांसाठी जीवनदायी ठरू शकतो रक्ताला मनुष्याने केलेल्या रक्तदानाशिवाय दुसरे कोणतेही पर्याय नाही आपले रक्तदान लाभार्थीचे जीव वाचू शकतो म्हणून रक्तदान हे अमूल्य आहे.मागच्या शिबिरात झालेल्या रक्तदानाने गरजू रुग्णांना नवजात बालकांना याचा न शुल्क लाभ मिळाला आहे.म्हणून आपणास विनंती करण्यात येते की आपण मागच्या शिबिराप्रमाणे या शिबिरात ही ,आपला

अनमोल सहभाग द्यावा

.विजय नागदेव

 कमिटी सदस्य

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.