Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जि. प. शिक्षकाच्या दोन्ही मुलांनी स्पर्धा परीक्षेत मिळवले दैदिप्यमान यश.जि. प. कन्या शाळेच्या वतीने सत्कार सोहळा.

 जि. प. शिक्षकाच्या दोन्ही मुलांनी स्पर्धा परीक्षेत मिळवले दैदिप्यमान यश.जि. प. कन्या शाळेच्या वतीने सत्कार सोहळा.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

लोहा प्रतिनिधि 

अंबादास पवार 

--------------------------------

 लोहा शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या वतीने शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक डी. आर. शिंदे यांच्या थोरल्या व धाकट्या अशा दोन्ही मुलांनी नुकत्याच घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले. त्यांच्या निवडीबद्दल जि. प. कन्या प्रशालेच्या वतीने विशेष कार्यक्रमात दोन्ही भावंडांचा सत्कार करण्यात आला.

                   महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत रिसनगाव ता. लोहा येथील मूळ रहिवाशी असलेले केंद्रीय मुख्याध्यापक डी. आर. शिंदे यांचे थोरले सुपुत्र अविनाश दिगंबर शिंदे यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन करून राज्यसेवा श्रेणी १ अधिकारी पदी निवड झाली तर धाकटे सुपुत्र अमित दिगंबर शिंदे यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत नांदेड जिल्हा परिषदच्या सांख्यिकी विस्तार अधिकारी पदी नियुक्ती झाली. यशस्वी दोनही शिंदे भावंडांचा जि. प. कन्या के. प्रा. शाळेच्या वतीने एका विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे, केंद्रीय मुख्याध्यापक बाबुराव फसमले, शालेय समिती अध्यक्षा सविता श्याम पाटील नळगे, सेवानिवृत्त मु. अ. एल. एन. पुंडे, बी. वाय. चव्हाण, केंद्रीय मुख्याध्यापक नरेंद्र कसबे, आबाजी पोले, महेंद्र कांबळे, पंडित शिंदे, कोंडे, गजानन उप्परवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

               प्रारंभी शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्याकडून गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक डी. आर. शिंदे, बी. बी. राठोड, वसंत राठोड, शिवकांता पुंडे, श्रीमती पांचाळ, श्रीमती तेलंग आदींसह बहुसंख्येने शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments