मोहजाबंदी येथे विधवा महिलेच्या हस्ते ध्वजारोहण.
मोहजाबंदी येथे विधवा महिलेच्या हस्ते ध्वजारोहण.
-----------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकूर
-----------------------------------
मोहजाबंदी येथील सरपंचाचा अभिनव उपक्रम रिसोड येथुन जवळच असलेल्या ग्राम मोजाबंदी येथील लोकनियुक्त सरपंच अँड,गजानन इंगळे यांनी ध्वजारोहण कार्यक्रम गावातील दिव्यांग विधवा महिला प्रयागबाई सखाराम काळे यांच्या हस्ते पार पडला त्यांच्या या अभिनव उपक्रमाने गावातील व परिसरातील नागरिक त्यांच्या प्रति आभार व्यक्त करत आहेत ,यापूर्वी सुद्धा 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कार्यक्रम गावातील माजी सैनिक श्री जगन्नाथ ठोंबरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले होते मोहजाबंदीचे लोकनियुक्त सरपंच एडवोकेट गजानन साहेबराव इंगळे हे नवनवीन आदर्श उपक्रम गावात नेहमीच राबवत असतात, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी कंबर कसली असून ध्वजारोहण कार्यक्रमासाठी त्यांनी एक घेतलेला अभिनव उपक्रम हा तालुक्यातील एक आदर्श ठरणारा असून इतरही परिसरातील व तालुक्यातील ग्रामपंचायतीने हा आदर्श घेण्याची गरज आहे, ध्वजारोहण कार्यक्रमाच्या कार्यक्रम वेळी सरपंच एडवोकेट गजाननराव साहेबराव इंगळे उपसरपंच उज्वला नागरे ,ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ पवार ,आरती सरदार, कलावती जाधव, देविदास जाधव सुमित्रा नागरे, गणेश कुटे ग्रामसचिव नितीन वाकुडकर, ग्रामपंचायत शिपाई प्यारेलाल नागरे, तंटामुक्ती अध्यक्ष विनोद इंगळे ,ग्राम रोजगार सेवक सचिन नागरे ,कृषी मित्र गजानन नागरे व नर्साने मॅडम, नर्साने सर ,काळे सर, अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस संगणक ऑपरेटर विजय चव्हाण, भिकाजी जाधव बाबाराव नागरे ,पंढरी नागरे रामेश्वर नागरे ,पुष्पा नागरे ,नामदेव इंगळे ,दीपक बनकर, रमेश मोरे ,कृष्णा नागरे ,पुंजाजी नागरे, प्रल्हाद नागरे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते यावेळी सरपंच व ग्रामसेवक सदस्य यांच्या कार्याचे कौतुक होत आहे शेवटी नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंचासह पदाधिकाऱ्यांचे आभार मानले वसमाधान व्यक्त केले
Comments
Post a Comment