धर्माध शक्तीच्या विरोधात उतरून संविधान वाचविण्यासाठी मतदारांनी प्रयत्न करावा.
धर्माध शक्तीच्या विरोधात उतरून संविधान वाचविण्यासाठी मतदारांनी प्रयत्न करावा.
राष्ट्रीय मतदारदिन उत्साहामध्ये साजरा.
---------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
नवी मुंबई प्रतिनिधी
रवी ढवळे
----------------------------------
दिघा :- सध्या देशात धर्माध शक्तीने डोके वर काढले आहे ते जर आपल्या खाली करायचे असेल मग आपणास भारतीय संविधान वाचविण्यासाठी येणाऱ्या काळात मतदारांनी आपल्या मताच्या माध्यमातून प्रयत्न करावे लागणार असल्याचे FN महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे नवी मुंबई जिल्हा प्रतिनिधी रवि पांडुरंग ढवळे सर यांनी आपल्या मनोगतामध्ये विचार मांडले.बालाजी सावळे यांच्या पक्षीय कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने बालाजी सावळे यांच्यातर्फे त्यांच्या कार्यालयात मोफत मतदार नोंदणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यास नागरीकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सदर कार्यक्रमाला नगरातील सर्व मान्यवर उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने रवि पी. ढवळे सर,जेष्ठ समाजसेवक बि. आर. सावळे,प्रशांत गायकवाड, अर्जुन नांदुरे, लक्ष्मण कावळे, रोशन मोरे, सहभागी होते.
त्याचप्रमाणे कार्यक्रमाला महिलांचा सहभाग ही होता. समाजसेविका अर्चना सावळे, पुष्पा चौहान, रंजना शेंडे, मंजू सिंग, अंजू यादव, सुनिता सरोज, संजू यादव यांचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलदीप कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शुभम सुर्यवंशी यांनी केले.
Comments
Post a Comment