भुदरगडमध्ये दोन्ही गटाकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जंयत्ती साजरी करण्यात आली
भुदरगडमध्ये दोन्ही गटाकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जंयत्ती साजरी करण्यात आली.
हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज मंगळवार दिनांक 23 जानेवारी रोजी शिवसेना कार्यालय गारगोटी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने
बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील उपतालुकाप्रमुख अविनाश शिंदे मेरी डिसोजा श्रीकांत हावळ, माया शिंदे, वसंत कांबळे, थॉमस डिसोजा अशोक दाभोळे ,महादेव मसुरकर, आदी शिवसैनिक उपस्थित होते तसेच शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देखील गारगोटी येथे शिवसेना संपर्क कार्यालयात वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर तालुकाप्रमुख संग्राम सावंत गारगोटीचे उपसरपंच सागर शिंदे रणधीर शिंदे प्रशांत भोई संदीप देसाई सचिन पिसे जितेंद्र भोसले सर्जेराव सावंत आदी शिवसैनिक उपस्थित होते तर
वेसर्डे येथे माजी तालुकाप्रमुख बचाराम गुरव यांनी ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करून अभिवादन केले यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Comments
Post a Comment