गांधीनगरचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी शंकर जाधव यांची नेमणूक.
गांधीनगरचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी दिपक शंकर जाधव यांची नेमणूक.
------------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
------------------------------------------
प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अवैध धंद्यावर वचक बसवणार का ?
लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी दीपक शंकर जाधव यांची नेमणूक केल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे कार्यभार स्वीकारल्यानंतर गांधीनगर मधील अवैध धंदे बंद करणार का ?
व्यापाऱ्यांच्या रोख रक्कमा असलेल्या बॅगा चोरट्यानी हातोहात लंपास केलेल्या आहेत त्या चोरट्यांचा बंदोबस्त करणार का अवैध धंदे ऑनलाइन मटका क्रिकेट बॅटिंग बेंटिंग कल्याण मटका गोवा बनावटीची दारू गावठी दारू गुटखा गांजा या सारखे अमली पदार्थ हे गांधीनगर मध्ये सरास विकले जात आहे त्यामुळे तरुण वर्ग व्यसनाधीन बनत आहे गांधीनगर अवैध धंद्यानी पोखरले असून बेरोजगार तरुण यामध्ये गुंतत चालला आहे.
गांधीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत वसगडे न्यू वाडदे उंचगाव सरनोबतवाडी चिंचवाड वळीवडे मुडशिंगी ही गावी येतात ह्या गावांमधून मागील तीन वर्षात चोरट्याने उच्छाद मांडला असून जवळ जवळ गोरगरिबांनी काबाडकष्ट करून मिळवलेली एक कोटीची संपत्ती चोरून नेली आहे या चोर-यांचा व चोरट्यांचा प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक शंकर जाधव तपास लावणार का? व गरिबाला न्याय मिळवून देणार का?
Comments
Post a Comment