नवीन वर्षाची सुरुवात नवीन टेक्नॉलॉजीने नव नवीन ठिबक च्या तंत्रज्ञानाने पिकांची काळजी कमी पाण्यामध्ये कशा पद्धतीने घेण्यात यावी.
नवीन वर्षाची सुरुवात नवीन टेक्नॉलॉजीने नव नवीन ठिबक च्या तंत्रज्ञानाने पिकांची काळजी कमी पाण्यामध्ये कशा पद्धतीने घेण्यात यावी.
-----------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सांगवडे प्रतिनिधी
विजय कांबळे
-----------------------------------------------
सांगवडे प्रतिनिधी /- चला करू नवीन वर्षाची सुरुवात नवीन टेक्नॉलॉजीने यावर्षी कमी पावसामुळे आपल्याकडे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे आपल्या पिकांची काळजी कमी पाण्यामध्ये कशा पद्धतीने घेण्यात यावी.तसेच नव नवीन ठिबक च्या तंत्रज्ञानाने आपल्या पिकांमध्ये उत्पादन कसे वाढवता येईल याचे योग्य असे मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये देण्यात आले. सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून यामध्ये भाग घेतला. कार्यशाळा ही जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव व कृषी राज एजन्सी चिंचवड अधिकृत वितरक यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आली. ऊस पिकावरील ठिबक सिंचन काळाची गरज व ठिबक संचाची निगा व देखभाल या विषयावर चर्चासत्र आयोजित केले गेले होते. परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी या मार्गदर्शनाचा खूप चांगल्या रीतीने लाभ घेतला.
या ग्रह कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुरेश मगदूम सीनियर ऍग्रो नॉमिस्ट जैन इरिगेशन सिस्टीम यांनी आपले मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले हा कार्यक्रम ग्रामपंचायत सांगवडे वाडी च्या दालनात घेण्यात आला. या कार्यक्रमास गावाचे सरपंच सुदर्शन खोत ग्रामपंचायत सदस्य सिदनुर्ले तसेच ग्रामपंचायत मधील सर्व कर्मचारी प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. सांगवडे वाडी गावाबरोबरच नजीकच्या हलसवडे व सांगवडे गावातील शेतकऱ्यांनीही या कार्यशाळेचा लाभ घेतला. शेतकऱ्यांच्या शंकाचे निरसन अतिशय छान पद्धतीने मगदूम सरांनी केले. सर्व शेतकरी परिपूर्ण होऊन या कार्यक्रमातून बाहेर पडले. हा कार्यक्रम महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या कृषी सहाय्यक गीता कांबळे मॅडम यांनी घडवून आणला .म्हणून सर्व शेतकरी वर्ग व अधिकारी वर्ग यांनी त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे नियोजन भरत पाटील कृषी राज एजन्सी चिंचवाड अधिकृत वितरक यांनी खूप छान पद्धतीने केले.
Comments
Post a Comment