मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश मुरगुड मध्ये आनंदोत्सव साजरा.
मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश मुरगुड मध्ये आनंदोत्सव साजरा.
---------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
---------------------------
मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी ते मुंबई पर्यंत धडक दिल्यानंतर
अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलं आहे. नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. सरकारने अध्यादेश जारी करत जरांगे यांच्यासह मराठा समाजाची मागणी मान्य केली आहे. मराठा समाजास आरक्षण मिळाल्याचा आनंदोत्सव मुरगुड मध्ये फटाके फोडून आणि साखर पेढे वाटून करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी अध्यादेश जारी करत कुणबी नोंदी सापडलेले सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे संपूर्ण मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे यावेळी सकल मराठा समाज समन्वयक संतोष भोसले व संकेत भोसले यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी नामदेवराव मेंडके,सर्जेराव भाट ओंकार पोतदार ,जगदीश गुरव, एस व्ही चौगुले, दगडू शेणवी, रणजीत मोरबाळे अभि मिटके, एडवोकेट दयानंद पाटील,अरुण मेंडके, दत्तात्रय मंडलिक, बजरंग सोनुर्ले,विशाल मंडलिक, पृथ्वी चव्हाण, अनिल रावण, नामदेव भराडे,
यावेळी दि.इ इंजिनीयर अँन्ड कॉन्टॅक्टर यांच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले
यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment