75वा. भारतीय प्रजासत्ताक दिन व वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा.
75वा. भारतीय प्रजासत्ताक दिन व वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा.
-------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
हातकणंगले प्रतिनिधी
दत्तात्रय कोळेकर
-------------------------------------
सौ सुनीतादेवी सोनावणे ज्ञानगंगा हायस्कूल मार्केट यार्ड कोल्हापूर येथे 75वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.लोकशक्ती संजीवन प्रतिष्ठान मुंबईचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.संजयजी सोनावणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
व्यवस्थापन समिती अध्यक्षा मा. सौ.अश्विनी मोरे उपस्थित होत्या. याप्रसंगी शालेय विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते सादर केली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक श्री कुमार किशोर आहुजा, शेतकरी सह.संघाचे नूतन संचालक श्री दत्ताजीराव पिराजी वारके, श्री संजयजी सोनावणे, चैतन्य प्रभू शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री जी एस पाटील (बापू) उद्योगपती गुरुनाथ घरत, सौ सुनीतादेवी सोनावणे, संस्कुती सोनावणे,श्री सुनील पाटील यांच्या शुभहस्ते कला, क्रीडा व साहित्य यामध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री धनाजी बेलेकर संस्था सचिव श्री गजानन काटकर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शुभचिंतक पालक, माजी विद्यार्थी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment