नवी मुंबई महानगरपालिकेचा 32 वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा.
नवी मुंबई महानगरपालिकेचा 32 वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा.
--------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
नवी मुंबई प्रतिनिधी
रवि पी. ढवळे
--------------------------------
नवी मुंबई :- सुजाण जनतेने उभे केलेले नवी मुंबई हे नावलौकीक प्राप्त शहर असून नवी मुंबईच्या प्रगतीत येथील नागरिक, लोकप्रतिनिधी व अधिकारी-कर्मचारी यांचा महत्वाचा वाटा असल्याचे सांगत ऐरोली विधानसभा सदस्य आमदार.गणेश नाईक यांनी कोविड काळात आपल्या जीवाची पर्वा न करता महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी केलेले काम तसेच शहराची गुणवत्ता कायम राखण्यासाठी नियमित केले जाणारे काम प्रशंसेस पात्र असल्याचे मत व्यक्त केले.
*नवी मुंबई महानगरपालिकेच्या 32 व्या वर्धापनदिनानिमित्त विष्णुदास भावे नाटयगृह येथे संपन्न झालेल्या विशेष समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी व्यासपीठावर बेलापूर विधानसभा सदस्य आमदार.मंदा म्हात्रे, महापालिका आयुक्त .राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व.विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपायुक्त .शरद पवार, शहर अभियंता .संजय देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवाळ उबाळे, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment