खोजेवाडीत तीन पानी जुगार अड्डयावर बोरगाव पोलिसांचा छापा; सुमारे 2 लाख 43 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

 खोजेवाडीत तीन पानी जुगार अड्डयावर बोरगाव पोलिसांचा छापा; सुमारे 2 लाख 43 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा  प्रतिनिधी 

---------------------------------

खोजेवाडी ता.सातारा येथील गावाजवळ कण्हेर कालव्याजवळ मळा नावच्या शिवारात आंब्याच्या झाडाखाली तीन पानी जुगार खेळत असताना बोरगाव पोलिसांनी धाडसी कारवाई करीत सुमारे 2 लाख 43 हजार 90 रुपये चा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी 1:05 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या घटनेत संशयित संजय उत्तम जाधव (वय 45),  मारुती विनायक शितोळे (वय58), रामदास साहेबराव देशमुख (वय59), धनाजी तुकाराम मदने (वय 45) सर्व रा. खोजेवाडी ता.सातारा असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताची नावे आहेत. या कारवाईत रोख रक्कम 1090 रूपये, दोन मोबाईल हँडसेट एकुण 17000 रुपये व रॉयल इन्फिल्ड क्लासिक रंगाची बुलेट 2 लाख 25 हजार रुपये किंमतीची असा सुमारे एकुण 2 लाख 43 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि रवींद्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, पोलीस हवालदार दादा स्वामी, प्रशांत चव्हाण, दीपककुमार मांडवे, केतन जाधव यांनी केली. अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे करत आहेत. 

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.