बोंद्रे नगर ते पाडळी खुर्द जाणारा 120 मीटर रस्ता महानगर पालिका का थांबवला ग्रामस्थांची मागणी.

बोंद्रे नगर ते पाडळी खुर्द जाणारा 120 मीटर रस्ता महानगरपालिका का थांबवला ग्रामस्थांची मागणी.
------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 
राधानगरी प्रतिनिधी 
विजय बकरे
------------------------------

बोंद्रे नगर ते पाडळी खुर्द कडे 160 मीटरचा रस्ता महानगरपालिकेने का थांबवला लोकांचे बळी या रस्त्यावर किती घेणार असा सवाल मथुरा कॉलनी परिसरातील मधील नागरिकांनी केला आहे

बोंद्रे नगर ते पाडळी खुर्द हा रस्ता ग्रामपंचायत व महानगरपालिका हद्दीत येत असून हा रस्ता पाडळी खुर्द ग्रामपंचायत ने आपल्या हद्दीमधील केला असून त्यामधील 160 मीटरचा रस्ता हा महानगरपालिकेच्या हद्दीत येत असून या संदर्भात या भागातील ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिकेने दुर्लक्ष करत आहे या रस्त्या च्या साईटला कचरा भरपूर प्रमाणात साचलाआहे व रस्त्याच्या शेजारी ड्रेनेज नसल्याने त्या रस्त्यावर पाण्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात साचले असल्याने त्या रस्त्यावरून मथुरा सी पी आर गणेश पार्क जिल्हा परिषद सृष्टी गगनगिरी के एम टी कॉलनी अशा कॉलनीतील नागरिक मोटरसायकलने जा व येत असतात या रस्त्यावर लहान मुले महिला वयस्कर माणसे मोटरसायकल वरून कित्येक जण पडले आहेत पण या रस्त्यावर किती जणांचे बळी गेल्यावर महानगरपालिका लक्ष देणार तसेच या रस्त्याच्या साईटला कचरा कचऱ्याचे ढीग साठले आहेत त्याची विल्हेवाट महानगरपालिका कधी लावणार या कचऱ्यामुळे या परिसरात रोगराई होऊन लोक आजारी पडल्यावर महानगरपालिका लक्ष देणार काय यासंदर्भात या भागातील नागरिकांनी निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिका दुर्लक्ष करत आहे हा रस्ता १६० मीटरचा तातडीने करण्यात यावा व कचऱ्याचे ढिग हलवण्यात यावेत अन्यथा रस्ता रोको सारखे आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशारा या परिसरातील नागरिकांनी महापालिकेला दिला आहे

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.