सातारा जिल्हा पोलीस दलातील 10 पोलीस निरीक्षक,14सहाययक पोलीस निरीक्षक आणि 20पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून, बदल्यांच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांनी काढले आहे.
सातारा जिल्हा पोलीस दलातील 10 पोलीस निरीक्षक,14सहाययक पोलीस निरीक्षक आणि 20पोलीस उपनिरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून, बदल्यांच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री समीर शेख यांनी काढले आहे.
-------------------------------------
फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
-----------------------------------------
सातारा - जिल्हा पोलिस दलातील १० पोलिस निरीक्षक, १४ सहायक पोलिस निरीक्षक आणि २० पोलिस उपनिरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या असून, बदल्यांच्या ठिकाणी तातडीने रुजू होण्याचे आदेश पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी काढले आहेत.
लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजण्यापूर्वीच या बदल्या करण्यात आल्या आहेत. एकाच ठिकाणी तीन वर्ष पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांचा बदल्या झालेल्यांमध्ये समावेश आहे. पोलिस निरीक्षक कोंडिराम पाटील यांची जिल्हा विशेष सातारा येथून कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सायबर पोलिस ठाण्यातील हेमंतकुमार शहा यांची फलटण शहर पोलिस ठाणे, संदीप जगताप, सातारा शहर पोलिस ठाण्यातून शिरवळ पोलिस ठाणे, सुनील शेळके, खंडाळा पोलिस ठाणे, बाळासाहेब भरणे, जिल्हा विशेष शाखा सातारा, विश्वजित घोडके, वाचक पोलिस अधीक्षक, विकास पाडळे, मानवी संसाधन पोलिस कल्याण, प्रदीप सूर्यवंशी, जिल्हा वाहतूक शाखा, सातारा, सुनील फडतरे, सायबर पोलिस ठाणे, श्रीसुंदर रजनीकांत, कऱ्हाड शहर पोलिस ठाणे येथे बदली झाली आहे.
सहायक पोलिस निरीक्षक अशोक हुलगे यांची वाठार पोलिस ठाणे, चिमाणजी केंद्रे यांची औंध पोलिस ठाणे, शिवाजीराव विभूते यांची रहिमतपूर पोलिस ठाणे, चेतन मछले मल्हार पेठ पोलिस ठाणे, किरण भोसले तळबीड पोलिस ठाणे, राहुल वरोटे पाटण पोलिस ठाणे, उत्तम भापकर कऱ्हाड शहर पोलिस ठाणे, गणेश कड कऱ्हाड शहर पोलिस ठाणे, विशाल वायकर फलटण शहर पोलिस ठाणे, अमित बाबर सातारा शहर पोलिस ठाणे, राजेश माने, वाचक अपर पोलिस अधीक्षक सातारा, अनिता मेणकर, जिल्हा वाहतूक शाखा, सातारा, संदीप सूर्यवंशी, वाहतूक नियंत्रण शाखा, सातारा येथे बदली झाली आहे.
पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, वाचक उपविभागीय, कोरेगाव, अश्विनी वाघमारे, काेरेगाव पोलिस ठाणे, प्रमोद सावंत, नियंत्रण कक्ष, सातारा, अर्जुन चोरगे, उपविभागीय पोलिस अधिकारी वाई, बशीर मुल्ला, कऱ्हाड शहर पोलिस ठाणे, शीतल जाधव, वाहतूक नियंत्रण शाखा, सातारा, शामराम मदने, नियंत्रण कक्ष सातारा, राजेंद्र पुजारी, वाचक उपविभागीय फलटण, विशाल जगताप, आर्थिक गुन्हे शाखा, सातारा, विश्वास कडव, वाचक उपविभागीय सातारा शहर, चांदणी मोटे, वाई पोलिस ठाणे, अनिल पाटील, वाहतूक नियंत्रण शाखा, कऱ्हाड शहर, भाग्यश्री चव्हाण, डायल ११२ नियंत्रण कक्ष, सातारा, महेश पाटील, कऱ्हाड शहर पोलिस ठाणे, भैरीनाथ कांबळे, वाचक उविपोअ कऱ्हाड, रत्नदीप भंडारे, सातारा शहर पोलिस ठाणे, कृष्णराज पवार, सायबर पोलिस ठाणे, दीपाली गायकवाड, वाचक उविपोअ दहिवडी, अशोक राऊत, जिल्हा विशेष शाखा सातारा येथे बदली झाली आहे.
Comments
Post a Comment