विद्यार्थी औद्योगिक दृष्ट्या तयार असणे काळाची गरज" डॉ. अजित एकल.

 “विद्यार्थी औद्योगिक दृष्ट्या तयार असणे काळाची गरज" डॉ. अजित एकल.

--------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

वाई प्रतिनिधी

कमलेश ढेकाणे 

---------------------------

"विद्यार्थी औद्योगिक दृष्ट्या तयार असणे काळाची गरज आहे. फार्मा इंडस्टी मध्ये सध्या भारत हा आघाडीवर असणारा देश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंडस्ट्री च्या गरजेनुसार आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करुन तयार असले पाहिजे". असे प्रतिपादन इंन्स्टा व्हिजन, सातारा चे संस्थापक डॉ. अजित एकल यांनी केले.


जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या रासायनिक विश्लेषणात्मक साधन पध्दती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झांबरे, अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक, भिमराव पटकुरे, प्रा. उत्तम कांबळे यांची उपस्थिती होती.


डॉ. अजित एकल म्हणाले, सध्या बेरोजगारी ही युवकांपुढील मोठी समस्या आहे. रसायनशास्त्रामधून पदवी घेवून स्वतःची कौशल्ये वाढविल्यास तुम्हाला रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होतील. त्यांनी आपल्या व्याखानातून वेगवेगळ्या रासायनिक साधनपध्दती विषयी मार्गदर्शन केले शिवाय केमिकल कंपन्यांमध्ये आवश्यक असणारी कौशल्ये व उपकरणे या बदद्दल त्यांनी


सखोल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांमधील नकारात्मक दृष्टीकोन कसा कमी करता येईल,


संकुचित वृत्ती न बाळगता स्वतःला प्रोत्साहित कसे करता येईल यावर थोडासा प्रकाश टाकला. आपल्या अध्यक्षीय मनोगतात मा. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले तरुणांनी आपली क्षमता ओळखली तर तो आपल्या बुध्दीच्या जीवावर जगालाही प्रभावित करु शकतो. पुस्तकी ज्ञान व्यवहारात वापरता आले पाहिजे. विद्यार्थी नविन विषयांचे अध्ययन करीत असताना का, कसे, कधी हे प्रश्न त्याला पडलेच पाहिजेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासात अग्रेसर असले तरी संवाद कौश्यल्यात मागे राहातात. म्हणून त्यांनी हि कौशल्ये आत्मसात करावीत असे आवाहन त्यांनी केले.


प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे यांनी प्रस्ताविक केले सौ. मंजिरी पिसाळ यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. निकिता सुर्वे, राजेश्री कांबळे यांनी सुत्र संचालन केले. पुजा भोसले यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी दिपाली पाटील, पूजा जायगुडे, ऋतुजा भोईटे, अक्षदा संकपाळ, अमोल धनावडे, भास्कर घोणे, अनिल सांवत, अनिल शेलार, अनिल लाखे, अनिल बोडरे, चेतन तावरे, किशोर पिसाळ यांनी परीश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.