तन्मय कळंत्रे ची सुवर्ण कामगिरी..!
तन्मय कळंत्रे ची सुवर्ण कामगिरी..!
-----------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
-----------------------------------------
६७ व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या गुल्फामला नमवत मिळवले गोल्डपदक..!
- - देशातील विविध गटातील 400 स्पर्धकांचा सहभाग.
- 44 ते 48 किलो गटात 36 स्पर्धकांमध्ये तन्मय कळंत्रे ठरला अव्वल.
व्हनाळी ता. कागल येथील तन्मय सचिन कळंत्रे यांने,राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.नुकत्याच अकोला येथे या स्पर्धा पार पडल्या असून,त्याच्या वयोगटात एकूण 36 स्पर्धकांमध्ये त्यांने अव्वल स्थान पटकावले,तसेच देशभरातून सुमारे विविध वयोगटात 400 पेक्षा जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत उस्फूर्त सहभाग नोंदवला होता.
सुवर्णपदक विजेत्या तन्मयची तामिळनाडू येथे होणाऱ्या 2024 "खेलो इंडिया "साठी निवड झाली आहे.त्याच्या या यशाचे पंचक्रोशीसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून कौतुक होत आहे. तसेच त्याच्यावर मित्र परिवाराकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.या राष्ट्रीय पातळीवरील विजयामुळे क्रीडा नगरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरच्या बॉक्सिंग खेळाच्या क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.सुवर्णपदकाला गवसणी घालताच व्हनाळी गावात फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
◾गोल्ड मेडल मिळवल्याशिवाय घरी परतणार नाही.!
तन्मयने यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रोप्य व कांस्यपदक पटकावले होते.मात्र गोल्ड मेडल मिळवण्यात त्याला यश आले नव्हते.गोल्ड मेडल मिळाल्याशिवाय गावात परतणार नाही. असा संकल्प त्यांने कुटुंबीयांशी केला होता.त्यानुसार त्यांने सकाळी ३ तास व संध्याकाळी ४ तास असा दिवसभरात ७ ते ८ तासांचा तज्ञ मार्गदर्शक श्री.सतीशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रशुद्ध प्रशिक्षणाचा कसून सराव केला. सरावात सातत्य राखत राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणे त्याला शक्य झाले.जिद्दीच्या जोरावर व सरावात सातत्य राखून त्यांने हे सुवर्ण लक्ष साध्य करून गावाचे नाव क्रीडा क्षेत्रात देश पातळीवर पोहोचवले आहे.तसेच आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांने आपला संकल्पही पूर्ण केला आहे.
◾असा झाला तन्मय चा शैक्षणिक व क्रीडा प्रवास.!
तन्मय चे प्राथमिक शिक्षण जरग नगर येथील साई इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाले.तसेच स्वावलंबी शिक्षण संस्था व जुनिअर कॉलेज येथे त्याचे पुढील शिक्षण सुरू आहे.सध्या तो बारावी आर्ट्स वर्गात शिकत आहे.त्यांने करिअर साठी शिक्षणाबरोबर खेळाचे महत्त्व ओळखले.त्यानुसार अभ्यासही केला व मैदानावर कसून सरावही केला.त्यामुळे सध्या तो अभ्यासासह राष्ट्रीय स्पर्धेत नाव गाजवत आहे.
◾प्रशिक्षक का बरोबर कुटुंबीयांचेही प्रोत्साहन.!
तन्मयला मैदानावर प्रशिक्षकांचे तर शैक्षणिक व खेळासाठी कुटुंबीयांचे मोलाचे साथ व प्रोत्साहन लाभले.यामध्ये आजी नंदाताई,आजोबा शंकरराव,आई वैशाली,वडील सचिन, काका जितेंद्र व राजेंद्र,व काकी अश्विनी व प्रियांका,भाऊ यश कळंत्रे कुटुंबीय व मामा महेश व ओमकार कौंदाडे परिवार तसेच मित्रपरिवार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन प्रोत्साहन व सहकार्य मिळाले.या जोरावर त्यांने आपल्या व्हनाळी गावचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर पोहोचवला आहे.
◾असा आहे तन्मय चा बॉक्सिंग खेळातील प्रवास.!
तन्मयने यापूर्वी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सुमारे ११ रोप्य व सुवर्णपदकांची कमाई केली आहे.या कामगिरीच्या जोरावरच त्याने अकोला येथे झालेल्या 67 व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून सुवर्णपदकाची कामगिरी बजावली आहे.
◾ऑलम्पिक मेडल जिंकण्याचे तन्मय चे लक्ष.!
नुकत्याच अकोला येथे झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत अव्वल स्थान पटकावल्यामुळे त्याची तामिळनाडू येथे होणाऱ्या "खेलो इंडिया" स्पर्धेसाठी निवड झाली आहे.यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला असून ऑलम्पिक मेडल मिळवण्याचे लक्ष त्यांने ठेवले आहे त्यानुसार त्यांने सरावात सातत्य ठेवण्याचा मानस केला आहे.यासाठी त्याला त्याचे क्रीडाशिक्षक प्रशांत मोटे यांचे तर सध्या क्रीडा प्रबोधिनीचे आदित्य मने,गजानन कबीर,योगेश निषाद,व जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश चंद्र भट्ट यांचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन लाभत आहे.
Comments
Post a Comment