राधानगरी येथील वनक्षेत्रपाल कार्यालय स्थलांतरण केल्यास प्रादेशिक वन विभागाच्या कार्यालयाला टाळेठोक आंदोलन करणार; वनहक्क व संवर्धन कृती समितीचा इशारा.

 राधानगरी येथील वनक्षेत्रपाल कार्यालय स्थलांतरण केल्यास प्रादेशिक वन विभागाच्या कार्यालयाला टाळेठोक आंदोलन करणार; वनहक्क व संवर्धन कृती समितीचा इशारा.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

राधानगरी प्रतिनिधी 

 विजय बकरे

-------------------------------

 राधानगरी येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या इमारतीमध्ये अनेक वर्षे प्रादेशिक वनविभागाचे कार्यालय कार्यरत आहे.मात्र अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सदरची जागा अपुरी आहे.अशी सबब पुढे करून सदरचे कार्यालय गैबी नाक्याच्या पाठीमागे संरक्षित सागाच्या व निलंगिरी जंगलामध्ये स्थलांतरित करण्याचा त्यांचा मनसुबा आहे.  

   मात्र राधानगरी तालुक्यातील सामान्य जनतेच्या व स्थानिक रहिवासी यांच्या अडचणी लक्षात न घेता सदरचे कार्यालय गैबी येथे बांधण्याचा घाट घातला आहे.सदरचे कार्यालय राधानगरी पासून ६ किलोमीटर असल्याने गोरगरीब शेतकरी व जनतेची गैरसोय होणार तालुक्यातील इतर सर्व कार्यालये मुख्यालयात असताना फक्त हेच कार्यालय गैबी येथे का? गैबी येथे उभारण्यात येणार असलेले हे प्रादेशिक वन विभागाचे कार्यालय स्थलांतरित न करणेबाबत निर्णय रद्द न झाल्यास राधानगरी तालुक्याच्या नागरिकांच्या व स्थानिकांच्या वतीने प्रादेशिक वन विभागाच्या कार्यालयास 3 जानेवारी 2024 रोजी टाळेठोक आंदोलन करण्यात येईल असा इशारा राधानगरी परिसर वन हक्क व संवर्धन समितीच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.या संदर्भात आम,प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, तहसीलदार अनिता देशमुख पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

या कार्यालयाचे स्थलांतरित करू नये यासाठी राधानगरी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींनी या समितीस पाठिंबा दर्शवला आहे.

      यावेळी कृती समितीचे निमंत्रक प्रा, पी एस पाटील, रमेश पाटील (बचाटे) ,रमेश राणे ,महेश तिरवडे,विक्रम पालकर, जयवंत धनवडे, उमेश जाधव, विठ्ठल भाटळे,महेश तिरवडे,सुरेश आडसूळ यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.