खिसमस व नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या मद्य पार्टीवर गुन्हे अन्वेषण शाखेने टाकला छापा.

 खिसमस व नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या मद्य पार्टीवर गुन्हे अन्वेषण शाखेने टाकला छापा.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

--------------------------------

नववर्षाच्या स्वागतासाठी व ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर उजळाईवाडी डोंगरावर असलेल्या माया कफेवर मद्य पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या मद्य पार्टीची खात्रीशीर माहिती पोलीस अधीक्षक महेन्द्र पंडीत यांना समजताच त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्य रात्री 1 वाजण्याच्या सुमारास उजळाईवाडी येथील माया कॅफेवर गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पाठवले असता त्या ठिकाणी कर्णकर्कश आवाजात गाणी व मद्याचा साठा 60 ते 65 पुरुष 40 ते 45 महिला मद्यधुंद अवस्थेत आढळून आले

या मद्य पार्टीचे आयोजन मयुरा राजकुमार चुटानी रा नागाळा पार्क यांनी केल्याची माहिती समोर येत आहे


मद्यसाठा रोख रक्कमेसह डीजे सह 2 लाख 82 हाजारचा मुद्देमाल पोलीसानी जप्त केला असुन कॅफेमालक दयानंद जयंत साळोखे रा उजळाईवाडी डिजे ऑपरेटर नागेश लहु खरात रा फुलेवाडी डीजे मालक दिगंबर रघुनाथ सुतार रा फुलेवाडी यांच्यासह कामगार गजेंद्र रामदास शेठ गौरव गणेश शेवडे रा शाहुपुरी यांच्या विरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

वेळेचे उल्लंघन करून विनापरवाना बेकायदेशीरित्या मध्य पार्ट्याचे केल्यास पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक महेन्द्र पंडीत यांनी सांगितले

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून बेकायदेशीर धंद्यावर वचक बसली आहे नक्की

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.