राधानगरी तालुक्यामधील दत्त मंदिरामध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
राधानगरी तालुक्यामधील दत्त मंदिरामध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
---------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
---------------------------
.दत्त भक्तांनी आज भजन
कीर्तन आणि श्री दत्तात्रय चरित्रग्रंथ वाचनाने पावन केला.सकाळपासूनच
दत्त मंदिरामध्ये भक्तांची गर्दी होती.
Vo - राधानगरी तालुक्यातील राधानगरी डिगस पिरळपैकीचौगलेवाडी,गुडाळआवळी बुद्रुक,आणाजे,खिंडी व्हरवडे,कसबा तारळे, कुंभारवाडी गावामध्ये दत्त जयंती मोठ्या
उत्साहात साजरी करण्यात आली.आज दत्त जयंतीनिमित्त पिरळ पैकी चौगलेवाडी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते .
राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील दत्त मंदिरात पहाटे साडेपाच वाजता काकडआरती पूजा आरती
झाल्यानंतर भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.दुपारी बारा वाजता
नैवध्ये आरती करण्यात आली.खिंडी व्हरवडे येथे दुपारी तीन वाजता गावातून
भजन आणि दत्त नामाचा जयघोष करत गावातून दिंडीचे आयोजन करण्यात आले होते गेली सात दिवस ज्ञानेश्वर पारायण आणि तीन दिवसांपासून गुरुचरित्र पारायण घेण्यात आली,यामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय होता.सायंकाळी दत्त जन्मकाळ सोहळा
साजरा करण्यात आला.सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
Comments
Post a Comment