Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पाच जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी मित्रांची झाली ,२३ वर्षांनी एकत्र भेट.

 पाच जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी मित्रांची झाली ,२३ वर्षांनी एकत्र भेट.

-------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

भणंग प्रतिनिधी

शेखर जाधव 

-------------------------------

मेढा :- तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर येथील डिप्लोमा इन को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट सहकार पदविकेचे सन 2000/01 मधील प्रशिक्षणार्थी यांचा स्नेहसंमेलन सोहळा नुकताच सातारा येथील साई सम्राट लाँन येथे संपन्न झाला 23 वर्षानंतर 45 मित्रांची छत्रपतींची राजधानी सातारा येथे भेट झाली त्यावेळी सर्वांचा आनंद गगणात मावत नव्हता त्यावेळी सर्वांनी मनसोक्त गप्पा मारल्या .गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र आल्याने तब्बल २३ वर्षांनी भेट झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.या गेट टुगेदरचे आयोजन कोपर्डीहवेली (कराड) चे रविंद्र पाटील यांनी केले होते. त्यांना साथ अजित मुळीक, नितिन दनाणे यांनी केली विशेष म्हणजे हे सर्व प्रशिक्षणार्थी मित्र सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होते .एकमेकांचे ओढीने सर्वजण एकत्र आले होते प्रशिक्षण काळातील मित्रांना भेटण्याची इच्छा प्रत्येकाची होती. मात्र, संपर्क होत नसल्याने ते साध्य होत नव्हते. मात्र, प्रबळ इच्छा , भेटण्याची ओढ असल्याने तरूण मित्र तसेच पन्नाशी पार केलेले सर्व मित्र पुन्हा एकत्र आले. सर्वांनी एकमेकांशी कौटुंबिक ,सामाजीक ,चर्चा मनसोक्त केल्या . तसेच आठ दिवसांपूर्वी खिलारे या मित्राची आई वारली होती परंतु खुप वर्षांनी मित्र भेटणार म्हणून ते स्वतः त्यांचे मुली सोबत मित्रांना भेटायला आले होते फक्त एकत्र येवून उपयोग नाही तर एखादा मित्र संकटात सापडला तर त्या मित्रास सर्वांनी मदत करणे गरजेच आहे असे मत संभाजी बनसोडे यांनी केले सदरचे मित्र सहकार, सामाजीक, सांप्रदायीक, व्यापारी, उदयोजक क्षेत्रात भरारी घेत आहेत त्यापैकी अभिमानास्पद म्हणजे सुभाष दादा गुजले हे महाराष्ट्र पोलीस मध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षक आहेत याचा सर्वांना अभिमान वाटला . आपण केलेली ही मैत्रीची साखळी कायम अशीच अबाधीत ठेवूया असे मत आयोजक रविंद्र पाटील यांनी मांडले काही दिवसापूर्वी मित्र खिलारे यांच्या आईचे निधन झाले मुळे त्यांचे आईस सर्वांनी आदरपूर्वक श्रधांजली वाहीली

       सुरुवातीला संदिप मोहीते यांनी सर्वांचे स्वागत केले त्यांनतर सर्वांनी स्वतःची, घरातील कुटुंबाची , आपण सद्या करतो काय याची माहीती दिली स्नेह मेळाव्यास उपस्थीत मित्र सर्व खुष होते सर्व मित्रांची एकत्रित भेट घडवून आणले बद्दल सर्वांचे वतीने आयोजक रविंद्र पाटील, नितिन दनाणे यांचा सत्कार करणेत आला तसेच फटाक्याच्या आतिषबाजीत, केक कापुन सर्वांनी आनंद व्यक्त केला 

अशाच सोहळ्याला कोल्हापूर येथे सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन वारणा शहापुर ( कोल्हापूर ) चे लोकनियुक्त सरपंच नागेश चौगुले यांनी सर्वांना केले सदर स्नेहमेळाव्यास रविंद्र पाटील, अजित मुळीक, लखन मोरे, संदिप मोहीते, सुनिल धनावडे, दत्ता पाटील,संभाजी बनसोडे, नागेश चौगुले ,संतोष पाटील , संजय घोरपडे, सुभाष गुजले, प्रदिप शिवथरे, अनिल धनावडे, श्रीकृष्ण बनसोडे, प्रदिप पवार, तात्या केंजळे, महादेव धायगुडे, असल्म मुल्ला, सुनिल कदम , विजय यादव , अनिल जाधव , राजेंद्र निंबाळकर , विक्रम पाटील , संदिप चाळके ,अनिल देसाई , प्रकाश मोरे , अजित खिलारे ,सुनिल संकपाळ , बाळासो पाटील ,आणि नितीन दणाणे उपस्थीत होते लखन मोरे यांनी आभार मानले

Post a Comment

0 Comments