सातारा कमानी हौद परिसरात फायरिंग.
सातारा कमानी हौद परिसरात फायरिंग.
----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
सातारा प्रतिनिधी
अमर इंदलकर
----------------------------
सातारा : सातारा शहरातील कमानी हौद परिसरात मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास सहा जणांच्या टोळीने दोघांना मारहाण करत फायरिंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नसून, परिसर मात्र भीतीने हादरून गेला आहे. दरम्यान, रस्त्यावर आडवी लावलेली दुचाकी बाजूला घे म्हटल्याच्या कारणातून मारहाण करत फायरींग केल्याचे समोर आले आहे.
धीरज ढाणे, हर्षद शेख (दोघे रा.मंगळवार पेठ, गुरुवार पेठ, सातारा) व अनोळखी चौघे असे हल्लेखोर होते. या घटनेत विशाल अनिल वायदंडे (वय 27, रा. शनिवार पेठ, सातारा) व त्याचा मित्र जखमी झाला आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, ही घटना (बुधवारी) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. विशाल वायदंडे हा दुचाकीवरून जात असताना हर्षद याने दुचाकी रस्त्यावर उभी केली होती. दुचाकी बाजूला घे म्हटल्याच्या कारणातून दोघांमध्ये वाद झाला. यांनतर हर्षद याने फोन करून त्याच्या साथीदारांना बोलावले. यातून पुन्हा संशयितांनी विशाल व त्याच्या मित्राला मारहाण करण्यास सुरुवात केली. याच वेळी चिडलेल्या संशयितांपैकी एकाने बंदूक काढून दोघांच्या दिशेने फायरींग केले. सुदैवाने दोघे यातून बचावले.
हल्ला झाल्याने कमानी हौद परिसर हादरून गेला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी धाव घेऊन तेथील पंचनामा केला. फायर केलेल्या पुंगळ्या पोलिसांनी जप्त केल्या. पहाटे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.
Comments
Post a Comment