संजय साबळे यांच्या ' बाबांना समजून घेताना ' पुस्तकाला पुरस्कार.

 संजय साबळे यांच्या ' बाबांना समजून घेताना ' पुस्तकाला पुरस्कार.

---------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

चंदगड प्रतिनिधी

आशिष पाटील

---------------------------

   अखिल भारतीय शब्द मंथन साहित्य समूह वाठार ता. कागल यांच्या मार्फत दि न्यू इंग्लिश स्कूलचे उपक्रमशिल शिक्षक संजय साबळे यांच्या ' बाबांना समजून घेताना ' या पुस्तकाला डॉ रविराज आसबे पुरस्कार दिला गेला . मुलांच्या भावना शब्दरूपात संपादीत करण्याचे काम श्री. साबळे यांनी या पुस्तकात केले आहे. श्री. साबळे यांनी लेखन चळवळ वाढविण्यासाठी आतापर्यंत मुलांसाठी पंधरा पुस्तके लिहिली आहेत.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मा. राजन मुठाणे , डॉ. श्रीकांत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. साबळे यांच्या पुस्तकाला पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य एन.डी देवळे, टी. एस. चांदेकर, टी .टी. बेरडे, बी.आर.चिगरे, डी.जी. पाटील, टि. व्ही. खंदाळे यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.