ढोलगरवाडीत शॉर्ट सर्किटमुळे ऊसाचा फड जळून खाक.
ढोलगरवाडीत शॉर्ट सर्किटमुळे ऊसाचा फड जळून खाक.
-----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
चंदगड प्रतिनिधी
आशिष पाटील
-----------------------------
ढोलगरवाडी (ता.चंदगड) येथील तेल शेत नावाच्या शेतात सोमवार (दि.२५ रोजी) सकाळी ११ वाजता शॉर्ट सर्किटमुळे ऊसाच्या फडाला लागली आहे. या दुर्घटनेत रामकृष्ण पाटील, गुंडू गावडू पाटील, वैजनाथ गुंडू पाटील, शिवाजी तुकाराम पाटील, नितीन शामराव पाटील, सुरेश जोतिबा कदम या शेतकऱ्यांचा जवळपास चार एकर ऊसाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जळालेल्या ऊसाची महावितरणने पाहणी करून कारखान्यांनी लवकरात लवकर उचल व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Comments
Post a Comment