पत्रकारांचा निवास प्रश्न सोडविण्यास प्राधान्य.
पत्रकारांचा निवास प्रश्न सोडविण्यास प्राधान्य.
--------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजीत ठाकुर
--------------------------------
‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक संदिप काळे; शैक्षणिक साहित्य वितरणाचा शुभारंभ.
वाशीम : पत्रकारांची देशव्यापी संघटना असलेली ‘व्हाईस ऑफ मीडिया’ ही संघटना पत्रकारांच्या कुटुंबियांच्या समस्या निवारणासाठी अग्रस्थानी आहे. या पार्श्वभुमीवर पत्रकारांच्या पाल्यांना वितरीत करण्यात येणाºया शैक्षणिक साहित्य किट वितरणाचा शुभारंभ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते आज १९ रोजी वाशीम येथे करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे यांनी पत्रकारांचा निवास प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन केले.
पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशन काळात नागपूर येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने तीन दिवस साखळी उपोषण करुन पत्रकारांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. तर मंगळवारी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकºयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून पत्रकारांच्या समस्या सोडविण्याची आग्रही मागणी केली. यानंतर परतीच्या प्रवासात संदिप काळे यांनी वाशीम येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या जिल्हा पदाधिकाºयांची भेट घेतली. याप्रसंगी संघटनेकडून पत्रकार पाल्यांसाठी दिल्या जाणाºया शैक्षणिक किट वितरणाचा शुभारंभ संदिप काळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा पदाधिकाºयांशी चर्चा करताना काळे यांनी वाशीम जिल्ह्यातील पत्रकारांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकार आवास योजना राबविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना दिल्या. सोबतच पत्रकारांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी संघटना शासन दरबारी पाठपुरावा करुन निवासाचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याची ग्वाही दिली. दरम्यान, संघटनेचे संस्थापक संदिप काळे यांनी वाशीम जिल्ह्यातील संघटनेच्या कामाचा आढावा घेत जिल्हाध्यक्ष व संपूर्ण चमुच्या कामाचे कौतुक केले. यावेळी जेष्ठ पत्रकार नंदकिशोर शिंदे, नंदकिशोर वैद्य, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जिल्हाध्यक्ष भागवत मापारी, विदर्भ कार्याध्यक्ष विठ्ठल देशमुख, विदर्भ कार्यवाह धनंजय कपाले, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील पाटील, जिल्हा सचिव रमेश उंडाळ, जिल्हा प्रवक्ता देव इंगोले, जिल्हा उपाध्यक्ष आकाश शिंदे, गणेश मोहळे, जिल्हा संघटक संदीप डोंगरे,प्रदीप पिंपळकर आदिंची उपस्थिती होेती.
Comments
Post a Comment