चंदगड डेपोचा पुन्हा भोंगळ कारभार सुरु.
चंदगड डेपोचा पुन्हा भोंगळ कारभार सुरु.
---------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
चंदगड प्रतिनिधी
आमृत गावडे
---------------------------
आज दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांपासून ते रात्री 8.00 पर्यंत गडहिंग्लज मधून चंदगड ला एकही गाडी गेली नाही. याचे ना कुणा लोकप्रतिनिधी ला पडलंय ना चंदगड तालुक्यातील नेत्यांना. एवढ्या वेळात अडकूर वस्तीची गाडी गेली. पण तीच गाडी पुढे चंदगड ला सोडायला या डेपो मॅनेजर साहेबांना काय होतंय ते समजत नाही. अडकूर चंदगड अंतर फक्त 15 किलोमीटर अंतर आहे खरंच या वस्तीच्या गाडीची गरज आहे का? की कुणाची यात सोय बघितली जाते?
तीच गाडी जर पुढे चंदगड ला सोडली असती तर तेवढी प्रवाशांची सोय झाली नसती काय.. एवढं पण या मॅनेजर साहेबांना कळत नाही काय. आज ना एकादशी आहे ना कोणती यात्रा ना कुठला संप की मुंबई सीजन पण गाड्या गेल्या कुठे??? याबाबत फोन केले असता फोन न उचलणे मोबाईल बंद ठेवणे असे प्रकार केले जातात. चंदगड डेपोच्या लँडलाईन वर फोन केला असता आमच्याकडे गाड्यांचे नियोजन नाही डेपो मॅनेजर ला सांगा असे सांगितले जाते. याबाबत मागील महिन्यात काही जागरूक नागरिकांनी आंदोलन केलं पण त्यांच्यावर केसीस टाकल्या गेल्या. हे असेच चालू राहिलं तर चंदगड डेपो चा स्वच्छ सुंदर डेपो म्हणून नंबर येऊन काय उपयोग. सध्या मागील महिन्यात गाजावाजा करून हिरकणी गाड्या आणल्या पण त्या गाड्यांचा दर जास्त असल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड आणि त्या गाड्या लोकल रूट ला चालत नाहीत. लॉंग रूटच्या प्रवाशांसाठी त्या उपयुक्त आहेत. खरं त्या गाड्या घेऊन सुद्धा चंदगड मधील प्रवाशांचे हाल थांबलेले नाहीत. आणि विशेष म्हणजे चंदगडमधील पत्रकार आहेत कुठं हा प्रश्न पडतो. चंदगड मधील लोकप्रतिनिधी, नेत्यांनी याबाबत लक्ष घालून प्रवाशांवर होणाऱ्या अन्यायाबाबत लक्ष घालतील हिच अपेक्षा....
Comments
Post a Comment