लग्नासाठी वऱ्हाड घेऊन निघालेल्या तवेरा गाडीला अपघात.
लग्नासाठी वऱ्हाड घेऊन निघालेल्या तवेरा गाडीला अपघात.
-------------------------------फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
बोरगाव प्रतिनिधी
बबन जामदार
------------------------------
आज 31 डिसेंबर,, बोरगाव रेंदाळ रोडवर,, लग्नाला जाणारी तवेरा गाडी ओव्हरटेक करण्याच्या नादात पलटी झाली , तवेरा गाडीच्या चालकासहित दोन महिला किरकोळ जखमी झाल्या आज मानकापूरच्या शाहीर कुंभार यांच्या मुलग्याचे डॉक्टर सौरभ कुंभार यांच्या लग्नाचे वराड घेऊन रेंदाळ मधी असणाऱ्या लग्न कार्यालयात जात असताना बोरगाव रेंदाळ रोडवर जंगमवाडी येथील एसटी स्टँड जवळ रेंदाळ कडे जाणाऱ्या पिकअप गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात तवेरा चालक रविराज आप्पासो कुंभार याचा स्टेरिंग वरील ताबा सुटल्याने उजव्या साईटला असणाऱ्या खोत यांच्या घरा जवळील चरीमध्ये एम एच झिरो नऊ सीएम 88 92 या तवेरा गाडी पलटी झाल्यामुळे अपघात झाला या लग्नाला जाणाऱ्या गाडीमध्ये श्रीमती विठाबाई मलकारी कुंभार वय 70,, तसेच रत्नाबाई भालचंद्र लष्करे वय वर्षे 65,, दोघीही मानकापूर तालुका निपाणी तसेच चंद्राबाई आकाराम कुंभार राहणार वडगाव या महिलेस सुद्धा किरकोळ दुखापत झाली असून तसेच गाडी चालक रविराज आप्पासो कुंभार याच्या हाताला जोरदार मार बसला आहे या सर्वांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून सोडून देण्यात आले या सर्वांची तब्येत चांगली असून,, तवेरा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे अपघाता ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी केली होती
Comments
Post a Comment