शेतकरी संघटनेचा दणका! भीमानगर येथे सर्विस रोड करण्याची नॅशनल हायवेची हमी.

 शेतकरी संघटनेचा दणका! भीमानगर येथे सर्विस रोड करण्याची नॅशनल हायवेची हमी.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

टेंभुर्णी/प्रतिनिधी

------------------------------

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भिमानगर (ता. माढा) येथे सातत्याने अपघात होत असल्याने उजनी कालव्यावरील पूल आणि सर्विस रोड करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी नॅशनल हायवे प्रकल्प व्यवस्थापक सोलापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे एनएचएआय कडून कार्यवाही न झाल्यास राष्ट्रीय महामार्गावर २७ डिसेंबर रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा दिल्यानंतर तात्काळ दखल घेत प्रत्यक्ष पाहणी करून सर्विस रोड आणि उजनी कालव्यावर पूल करण्याची हमी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.



राष्ट्रीय महामार्गावरील भिमानगर येथे उजनी व्यवस्थापन कार्यालये, बँक, आठवडे बाजार, उजनी धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची सातत्याने वर्दळ असते. नॅशनल हायवेकडून गेल्या काही महिन्यांपूर्वी भिमानगर चौकातील रोड क्रॉसिंग बंद केल्याने नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी गैरसोय होत होती. इंदापूर आणि टेंभुर्णीकडे जाणाऱ्या नागरिक,महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एनएचएआयने रोड क्रॉसिंग बंद केल्याने दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या उजनी पाटी आणि सरदार ढाबापासून वळसा घालून यावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेने आक्रमक होत रास्ता रोको करण्याचा इशारा दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यास भाग पाडून प्रत्यक्ष पाहणी करून तात्काळ काम चालू करण्याची हमी दिली.




यावेळी नॅशनल हायवे प्रोजेक्ट मॅनेजर दिनेशचंद्र शाही, टेंभुर्णी पोलीस निरीक्षक दीपक पाटील, मोहसीन शेख धीरज चौधरी, प्रताप पिसाळ संतोष पाटील, निलेश मेटे, राजू बनसोडे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.