हनी ट्रॅप म्हणजे काय?
हनी ट्रॅप म्हणजे काय?
------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
------------------------------------
आणि काही टोळ्या त्याचा फायदा कशा प्रकारे घेतात! महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जागृती व्हावी आणि निर्दोष व्यक्ती वाचाव्यात ह्या करिता.-: त्या वेळी..सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं होत . मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आले होते .मात्र,आरोप करणाऱ्या महिलेवर विविध पक्षातील नेत्यांनी आरोप केल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं होत.'हनी ट्रॅप'चा नवा अँगल या प्रकरणात समोर आला होता.'हनी ट्रॅप' हा काय प्रकार असतो? याचा घेतलेला हा वेध... (What is Honey Trap?)हनी ट्रॅप म्हणजे...
मोहात पाडू शकणाऱ्या किंवा आकर्षक व्यक्तींचा वापर करून एखाद्याला जाळ्यात अडकवणे व विविध कारणांसाठी त्याचा वापर करून घेण्याच्या पद्धतीला 'हनी ट्रॅप' म्हणतात. ब्रिटीश इंग्रजीमध्ये हा शब्द चांगलाच प्रचलित आहे. हेरगिरीच्या जगात ही संज्ञा सर्वप्रथम वापरली गेली. आता पत्रकारितेत हा शब्द सर्वाधिक वापरला जातो. या प्रकारावर हॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटही होऊन गेले आहेत. सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात असे हनी ट्रॅप ला बळी पडलेले उद्योजक, कंपनीचे मालक, व्यवसायिक हे पाहायला मिळत आहेत. अशा टोळ्या सक्रिय झालेल्या पाहायला मिळत आहेत. ज्या टोळ्या संघटित पणे ह्या गोष्टी करत आहेत. पोलीस चौकीत नुसते मोकळे अर्ज द्यायचे आणि अशा मोठ्या व्यवसाईकांना,परस्पर संमतीने झालेल्या गोष्टीत देखील बलात्काराचा गुन्हा टाकेल अशी भीती दाखवून परस्पर पैसे उखळायचे हे धंदे निर्दोषपनात पैसे कमावून द्यायचे आणि ब्लॅक मेल करायचे साधन होत चालले आहे. संबंधित व्यक्तीच्या भीतीचा येथे फायदा घेतला जातो! आणि पैसे उखळ केली जाते. काही ठिकाणी (भ्रष्टाचारी)पोलीस मॅनेज केले जातात!आणि पैशाचं आमिष काम करते! हनी ट्रॅप केलेले म्हणजे.. हेरलेले सावज ( उद्योजक, कंपनी मालक, थोडक्यात बक्कळ पैसा असणारी व्यक्ती) सदर व्यक्तीकडून खूप मोठ्या रक्कम हस्तगत केल्या जातात. पोलिसांनी अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करायला आलेल्या संबंधिताची सखोल चौकशी करून. त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, कोठे राहतात, काय व्यवसाय करतात इत्यादी परिपूर्ण माहिती घेऊन सत्य काय असत्य काय आहे, ही शहानिशा करून गुन्हा एफ.आय.आर. करावा. आणि अशा गोष्टीत जर का गुन्हा माघे घ्यायचे विधान जर का फिर्यादी करत असेल तर समजून जावे कि हे फक्त मॅनेजमेंटसाठी केलेले नाटक अर्थात हनी ट्रॅप.
Comments
Post a Comment