नृसिंहवाडी दत्तधाममध्ये पारायण सप्ताहाची सांगता.
नृसिंहवाडी दत्तधाममध्ये पारायण सप्ताहाची सांगता.
----------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कुरुंदवाड प्रतिनिधी
------------------------------
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम मध्ये दत्तजयंती निमित्त गेले आठ दिवस सुरु असलेल्या सामुहिक श्री गुरुचरित्र वाचन,अखंड नामजप,जप,यज्ञ सप्ताहाची सत्यदत्त पुजन करुन महाआरतीने सांगता करण्यात आली.
सप्ताहाकालात सामुहिक श्री गुरुचरित्र वाचन,२४ तास अखंड नामजप,प्रहर सेवा,श्री गणेश याग,मनोबोध याग,श्री गीताई याग,श्री स्वामी याग,श्री चंडी याग,श्री रुद्र याग,श्री मल्हारी याग तसेच विविध सेवा स्वामी चरणी रुजु करण्यात आल्या.
सकाळी आठच्या भुपाळी आरतीनतंर मान्यवर यजमानांच्या हस्ते श्री सत्यदत्त पुजन करण्यात आले.साडेदहा वा.पुरणाचा नैवेध दाखवुन महाआरती करण्यात आली.यानतंर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.सेवाकेंद्राच्या मुल्यसंस्कार विभागाद्वारे तयार करण्यात आलेली "वृध्दाश्रममुक्त भारत" अभियानावर नाटीका मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात आली.
सेवाकेंद्राच्या माध्यमातुन चालविण्यात येणार्या विविध अठरा विभागाची तपशिलवार माहीती सांगण्यात आली.
श्री गुरुचरित्र वाचन सप्ताहासाठी कोल्हापुरसह सांगली,सातारा,पुणे,मुबंई,नाशिक लातुर,जळगांव,नदुंरबार,बेळगाव,संगमेश्वर, आदी भागातुन साडेतीनशे सेवेकर्यानी आपली सेवा श्री स्वामी चरणी रुजु केली.
Comments
Post a Comment