सूर्यपुत्र यशवंत भीमराव आंबेडकर यांची जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय विष्णूनगर येथे साजरी.
सूर्यपुत्र यशवंत भीमराव आंबेडकर यांची जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय विष्णूनगर येथे साजरी.
-----------------------------
नवी मुंबई
रवि पी. ढवळे
-----------------------------
दिघा :- भारतीय बौध्द महासभेंचे दुसरे अध्यक्ष सूर्यपुत्र माजी आमदार यशवंत भीमराव आंबेडकर यांची जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय विष्णूनगर येथे साजरी कारण्यात आली. सर्वप्रथम महापुरुष यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.
या जयंती निमित्त मुलामध्ये दोन गट बनवून सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या मध्ये प्रथम, दुसरा, तिसरा क्रमांक काढून पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
या वेळी लहान मुले, जेष्ठ नागरिक, महिला, भारतीय बौध्द महासभेचे विष्णूनगर शाखेचे पदाधिकारी उपस्थिती होती.शेवटी जयंती निमित्त जिलेबी वाटप करण्यात आली.
Comments
Post a Comment