दहशतीच्या हेतुने सूरा घेऊन फिरणाऱ्या दोघांना गांधीनगर पोलीसानी केले जेरबंद.
दहशतीच्या हेतुने सूरा घेऊन फिरणाऱ्या दोघांना गांधीनगर पोलीसानी केले जेरबंद.
---------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
---------------------------------
गांधीनगर, ता.२५ः दहशत माजविण्याच्या हेतुने सुरा घेऊन फिरणाऱ्या योगेश मोहन पोवार (वय २३ वर्षे, रा. निकम गल्ली, कळंबा) आणि ओंकार रविंद्र आवळे (वय २४ वर्षे, रा. विश्वशांती चौक, कनान नगर, कोल्हापूर) या दोघांना गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात पोलीस कॉन्स्टेबल सुनील कुंभार, अमोल देवकुळे यांनी ताब्यात घेतले.
याबाबतची माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंदी आदेश असतानाही आज दुपारी दोनच्या सुमारास सराईत गुन्हेगार योगेश आणि ओंकार हे मोटारसायकल क्रमांक एम एच ०९ जी एन १२९० या मोटारसायकलीवरुन गांधीनगर मुख्य रस्त्यावर दहशत माजविण्याच्या हेतुने हातामध्ये १५ इंच लांबीचा लोखंडी सूरा घेऊन फिरत होते. तसेच हातामध्ये शस्त्र घेऊन मुख्य रस्त्यावर हयगयीने आणि बेदरकारपणे वाहन चालवित होते. याची माहिती मिळाल्यानंतर गांधीनगर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेऊन आधीक माहिती घेतली असता समजले की, योगेश पोवार याचेविरुध्द राजारामपुरी आणि शाहुपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून ओंकार आवळेच्या विरोधात शाहुपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमोल अर्जुन देवकुळे यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील करत आहेत.
-------------
Comments
Post a Comment