उसने दिलेले पैसे परत मागीतल्यावरुन एकास बेदम मारहाण!
उसने दिलेले पैसे परत मागीतल्यावरुन एकास बेदम मारहाण!--------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
--------------------------------------
गांधीनगर : उसने दिलेले पैसे परत मागीतल्यावरुन एकास बेदम मारहाण झाल्याची घटना दोन दिवसा पुर्वी गडमुडशींमध्ये घडली
या घटनेची आधीक माहिती अशी की
राजीव गांधी वसाहत मार्केट यार्ड मध्ये राहणारे चेतन बंडू कुराडे व.व.33 यांनी गडमुडशींगी येथील अरबाज शब्बीर लाटकर व.व.23 याला काही कामानिमित्त हात उसने पैसे दिले होते ते पैसै परत मागयला गेलेल्या चेतन बंडू कुराडे यास दि 02/12/2023 रोजी अरबाज शब्बीर लाटकर व नवाज शब्बीर लाटकर या दोन भावांनी चेतन बंडू कुराडे यास विटेने डोळ्यांवर कपाळावर तोंडावर मारहाण केली असल्याची फिर्याद चेतन बंडू कुराडे यांनी दि 03/12/2023 गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली असून गांधीनगर पोलीसानी गु र नं 457/2023 भा द वि संहिता कलम 326 (अ) 323,34 प्रमाणे दाखल करण्यात आली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल कुंभार हे आधीक तपास करत आहेत
Comments
Post a Comment