सातारा जिल्ह्यातील रेठरे खुर्द येथील जवान अनिल कळसे यांना वीर मरण.
सातारा जिल्ह्यातील रेठरे खुर्द येथील जवान अनिल कळसे यांना वीर मरण.
----------------------------------
फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
----------------------------------
सातारा जिल्ह्यातील रेठरे खुर्द येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान अनिल कळसे दिनकर यांना काल मणिपूर येथे कार्यरत असताना अपघातात वीरमरण आले.त्यांच्या मागे आई,वडील,भाऊ, पत्नी, मुले, असा परिवार आहे.शाहिद जवान अनिल कळसे हे भारतीय सैन्य दलात हवालदार ह्या पदी मणिपूर मध्ये देश सेवा बाजावत होते.भारतीय सेनेतील बॉंबे इंजिनिअरिंग ग्रुप मधील 267 इंजिनिअरिंग रेजिमेंट मध्ये ते कार्यरत होते. पुढील वर्षी ते निवृत्त होणार होते. ह्या घटनेने त्यांच्या परिवारावर मित्रपरिवारावर तसेच गावावर शोककळा पसरली आहे.
Comments
Post a Comment