आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन आयोजित घरोघरी श्रीराम मंदिर या अभिनव संकल्पनेच्या नाव नोंदणी शुभारंभ संपन्न.

 आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन आयोजित घरोघरी श्रीराम मंदिर या अभिनव संकल्पनेच्या नाव नोंदणी शुभारंभ संपन्न.

---------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

---------------------------------------

दि.०१ ते ०५ जानेवारी पर्यंत नाव नोंदणीची मुदत; शहरातील प्रमुख चौकात नाव नोंदणीसाठी पेंडॉल.

कोल्हापूर, ३० : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूरमध्ये राबविण्यात येत असलेल्या घरोघरी श्रीराम मंदिर या संकल्पनेचा नावनोंदणी शुभारंभ सोहळा आज रोजी मिरजकर तिकटी, शेषनाग मंदिरासमोर उत्साहामध्ये संपन्न झाला. सदर सोहळा कोल्हापूरमधील प्रतिष्ठीत महंताच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळयास श्री सद्गुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट, कोल्हापूर व श्री सद्गुरु दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठान, कोल्हापूरचे विद्यमान अध्यक्ष श्री.आनंदनाथ सांगवडेकर महाराज, विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर, कोल्हापूरचे अध्यक्ष श्री.निरंजनदास सांगवडेकर, वेदमूर्ती सुहास जोशी, श्री राघवेंद्र स्वामी मठ श्री श्री सुभुदेंद्र तिर्थ स्वामीजी यांचे कोल्हापूर मठा तर्फे श्री.मयुर कुलकर्णी स्वामीजी व श्री.विश्वनाथ देशपांडे, श्री स्वामी समर्थ सेवक - संजय घाटगे (मामा) आदि महंत उपस्थित होते. श्री.आनंदनाथ सांगवडेकर महाराज व श्री.मयुर कुलकर्णी स्वामीजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान ऑनलाईन व ऑफलाईन नावनोंदणीच्या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनातून श्रीराम मंदिराची प्रतिकृती बनविता येणारी आकारसेवा पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तिकेमध्ये देण्यात आलेले मंदिराचे भाग एकत्र जोडून मंदिराची प्रतिकृती बनविता येते. प्रत्येक घरात सर्व कुटूंबियांनी एकत्र मिळून श्रीराम मंदिराची प्रतिकृती बनवावी व २२ जानेवारी २०२४ रोजी मंदिराचे पूजन आपापल्या घरी करावे यासाठी सदर घरोघरी श्रीराम मंदिर ही संकल्पना राबविली जात आहे. 


सदर पुस्तिका श्री.राजेश क्षीरसागर यांचे तर्फे सर्व रामभक्तांना मोफतपणे देण्यात येणार आहे. पुस्तिका मिळविणेसाठी पूर्वनावनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी कोल्हापूरातील विविध ठिकाणी नावनोंदणी पेंडॉल उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याठिकाणी प्रभू श्रीराम भक्तांना लेखी अर्ज भरुन नाव नोंदविता येईल. त्याचबरोबर घरबसल्या नावनोंदणीसाठी ऑनलाईन नोंदणीचा पर्यायही उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यासाठी 7049728683, 8188904500, 7447327176 या व्हॉटस् क्रमांकावर ‘जय श्रीराम’ हा संदेश पाठवावयाचा आहे व आलेल्या लिंकवर क्लिक करुन ऑनलाईन फॉर्म भरावयाचा आहे. सदर नावनोंदणी दि.५ जानेवारी २०२४ पर्यंत उपलब्ध असणार आहे. नावनोंदणी केलेल्या सर्वांना दि.१६ जानेवारी २०२४ नंतर पुस्तिका वाटप करण्यात येणार आहेत.


या पुस्तिकेमध्ये अयोध्या श्रीराम मंदिराचा इतिहास, संपूर्ण रामायण चित्रमय रुपात, रामरक्षा, प्रभू श्रीरामांची १०८ नावे, तसेच लहान मुलांना रंगविण्यासाठी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमा व इतर काही कलात्मक ॲक्टिव्हिटीज यांचा समावेश करण्यात आला आहे. याच संकल्पनेअंतर्गत ‘‘श्रीराम मंदिरासोबत सेल्फी’’ हा एक उपक्रम राबविला जाणार असून यामध्ये सर्वांनी बनविलेल्या श्रीराम मंदिर ३डी प्रतिकृतीसोबत आपल्या कुटूंबाचा एक सेल्फी पाठवावयाचा असून, यामधून लकी ड्रॉच्या माध्यमातून १० कुटूंबांना अयोध्येला जाण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.


सदर संकल्पना व श्रीराम मंदिर आकारसेवा पुस्तिकेबद्दल माहिती श्रीअत्री प्रिंटींग हाउुसचे साईप्रसाद बेकनाळकर यांनी करुन दिली. आज पार पडलेल्या नांव नोंदणी सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, माजी नगरसेवक बाबा पार्टे, शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई सालोखे, शहरप्रमुख सौ.पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, सुनिता भोपळे, सौ.गौरी माळदकर, रणजीत मंडलिक, गणेश रांगणेकर, शारदा धामणे, संतोष कंदारे, किशोर सराफ, अमर निंबाळकर, प्रकाश भोसले, माजी नगरसेवक ॲड.अमोल माने सोहळयाचे प्रास्ताविक श्री.अंकुश निपाणीकर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.