पिक विमा न मिळाल्यास प्रहार जनशक्ती मोफत करणार अवयव दान.
पिक विमा न मिळाल्यास प्रहार जनशक्ती मोफत करणार अवयव दान.
---------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
हिंगोली प्रतिनिधि
---------------------------
हिंगोली नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे खरीप आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर शेतकरी अडचणीत सापडला आहे पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून मागील दोन वर्षापासूनचा पिक विमा शेतकऱ्यांना न मिळाल्यास ,प्रहार जनशक्तीच्या वतीने मंत्रालयासमोर अवयव दान करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती च्या वतीने ऐका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी मागील दोन वर्षांपासून पीक विमा क्लेम पासून वंचित ठेवले तसेच हातातोंडासी आलेला घास येलो माझकने हिरावून घेतला आहे रब्बी हंगामाची कर्जबाजारी करून पेरणी केली असता आता अतिवृष्टीने तूर कापूस व इतरही पिकांचे नुकसान झाले आहे व शेतकऱ्यावर नैसर्गिक संकट ओढवलेअसून यावर सरकार कुठलेही प्रकारचे पाऊल उचलत नाही प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी चक्क स्वतःच्या शरीराचे अवयव विक्रीस काढले असून अवयवचे दर निश्चित करून विक्रीसाठी तयार आहेत सरकार घ्यायला तयार नाही आणि शेतकऱ्याला मदत करायला देखील तयार नाही त्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख रवी उर्फ रॉबट बांगर, जिल्हा संघटक विलास आघाव युवा जिल्हा प्रमुख अमोल खिल्लारी पाटील तसेच इतर पदाधिकारी दिनांक ०४ १२ २०२३ रोजी मंत्रालयासमोर सरकारला मोफत अवयव विक्री आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हा कृषी अधिकारी यांच्यामार्फत शासनाला देण्यात आला आहे
Comments
Post a Comment