Posts

Showing posts from December, 2023

प्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या 19 चालकांवर कारवाई.

Image
  प्रादेशिक परिवहन कार्यालय व जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने मद्यपान करुन गाडी चालवणाऱ्या 19 चालकांवर कारवाई. ------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर प्रतिनिधी  जावेद देवडी ------------------------------------------  जिल्ह्यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर व जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमानाने दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या 19 चालकांवर मोटर वाहन कायदा व नियम अंतर्गत कारवाई करण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली.  प्रादेशिक परिवहन विभागाची सहा पथके यामध्ये सहभागी झाली होती. कोल्हापूर शहर, इचलकरंजी शहर व जयसिंगपूर येथे या पथकांमार्फत एकाच वेळी तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामध्ये एकूण 19 दुचाकी स्वार दारु पिऊन वाहन चालवताना आढळले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. जिल्ह्यामध्ये दुचाकीस्वारांच्या अपघाताचे प्रमाण जास्त असल्याने प्रादेशिक परिवहन विभागाकडून अशा प्रकारची मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील व पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.  या मोहिमेमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटर वाहन

देशाला विकसित बनविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचा संकल्प करुया केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार.

Image
देशाला विकसित बनविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचा संकल्प करुया केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार. -------------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर प्रतिनिधी  -------------------------------------------- *विकसित भारत संकल्प यात्रेला राज्यमंत्री भारती पवार यांची भेट. *शिंगणापूर येथील शासकीय योजनांच्या यात्रेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद *प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत शिंगणापूरचे कार्य उल्लेखनीय* कोल्हापूर, दि.31 : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देवून नागरिकांना सक्षम बनवूया. देशाला आणखी विकसित बनविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचा संकल्प या नववर्षाच्या सुरुवातीला करुया, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी केले.        करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे विकसित भारत संकल्प यात्रेला केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेतील चित्ररथाचे फित कापून अनावरण करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते प

लग्नासाठी वऱ्हाड घेऊन निघालेल्या तवेरा गाडीला अपघात.

Image
  लग्नासाठी वऱ्हाड घेऊन निघालेल्या तवेरा गाडीला अपघात. ------------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  बोरगाव प्रतिनिधी बबन जामदार   ------------------------------ आज 31 डिसेंबर,, बोरगाव रेंदाळ रोडवर,, लग्नाला जाणारी तवेरा गाडी ओव्हरटेक करण्याच्या नादात पलटी झाली , तवेरा गाडीच्या चालकासहित दोन महिला किरकोळ जखमी झाल्या आज मानकापूरच्या शाहीर कुंभार यांच्या मुलग्याचे डॉक्टर सौरभ कुंभार यांच्या लग्नाचे वराड घेऊन रेंदाळ मधी असणाऱ्या लग्न कार्यालयात जात असताना बोरगाव रेंदाळ रोडवर जंगमवाडी येथील एसटी स्टँड जवळ रेंदाळ कडे जाणाऱ्या पिकअप गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात तवेरा चालक रविराज आप्पासो कुंभार याचा स्टेरिंग वरील ताबा सुटल्याने उजव्या साईटला असणाऱ्या खोत यांच्या घरा जवळील चरीमध्ये एम एच झिरो नऊ सीएम 88 92 या तवेरा गाडी पलटी झाल्यामुळे अपघात झाला या लग्नाला जाणाऱ्या गाडीमध्ये श्रीमती विठाबाई मलकारी कुंभार वय 70,, तसेच रत्‍नाबाई भालचंद्र लष्करे वय वर्षे 65,, दोघीही मानकापूर तालुका निपाणी तसेच चंद्राबाई आकाराम कुंभार राहणार वडगाव या महिलेस सुद्धा किरकोळ दुखापत झाली असून तसेच ग

चिमगाव (ता कागल) येथे 1 कोटी 9 लाख रू.च्या विकासकामांचा शुभारंभ.

Image
  चिमगाव (ता कागल) येथे 1 कोटी 9 लाख रू.च्या विकासकामांचा शुभारंभ. -------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मुरगूड  प्रतिनिधी  जोतीराम कुंभार --------------------------------- शाश्वत विकासकामांना प्राधान्य देणार ; राजे समरजितसिंह घाटगे.     गेल्या पंचवीस वर्षांपासून सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडित शाळा दुरुस्ती,अंगणवाडी, वीज, आरोग्य केंद्र याबाबतीत भरीव शाश्वत विकासाची कामे झालीच नाहीत. मात्र छत्रपती शाहू महाराज आणि स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांची दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून सामाजिक स्तर उंचाविण्यासाठी आमच्याकडे कोणतेही संविधानिक पद नसतानाही आशा शाश्वत विकासकामांना प्राधान्य देत आहोत असे प्रतिपादन भाजपचे नेते शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.      चिमगाव ( ता.कागल) येथे राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या 1 कोटी 9 लाख रु. विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.         यामध्ये गावातील प्रामुख्याने श्री.चिमकाईदेवी मंदिर सुशोभीकरणासाठी 1 कोटी रु. गैबी चौक

मुरगुडला न्यायालय झालंच पाहिजे नाहीतर तिव्र आंदोलन करु मा.उपनगराध्यक्ष दगडू शेणवी.

Image
  मुरगुडला न्यायालय झालंच पाहिजे नाहीतर तिव्र आंदोलन करु मा.उपनगराध्यक्ष दगडू शेणवी. ---------------------------------  फ्रंलाईन न्युज महाराष्ट्र  मुरगूड प्रतिनिधी  जोतीराम कुंभार ---------------------------------  मुरगुडला न्यायालय झालंच पाहिजे वकिलांनी विरोध केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा मुरगुडचे माजी उपनगराध्यक्ष व भारतीय जनता पार्टी कागल तालुका युवाअध्यक्ष दगडू शेणवी दिला. ते म्हणाले कागल तालुक्यातील 85 गावांपैकी 58 गावे भौगोलिक दृष्ट्या मुरगुड शहरांशी मध्यवर्ती ठिकाण म्हणून संलग्न आहे पक्षकारांना कागलला जाण्या येण्या च्या गैरसोयी होत आहेत त्यामुळे मुरगुड येथे दिवाणी न्यायालय व्हावे पण कागल तालुक्यातील मोजक्याच वकिलाकडून विरोध होत आहे  25 वर्षापासून वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू होते आता त्यातच कागलच्या स्थानिक वकिलांनी वैयक्तिक हितासाठी विरोध दर्शविला आहे. तो विरोध स्वार्थी आहे असे दगडू शेणवी याने आपल्या तिव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके , एस. व्हि. चौगुले ,जयसिंग भोसले , किरण गव्हाणकर ,दिगंबर परीट , अमर चौगुले राजू चव्हाण , विनोद निकम,

बोरगावं पोलिसांची धडाकेबाज कामगिरी महाराष्ट्रात बंदी असलेला पंचवीस लाखाचा (तंबाखु) गुटखा केला जप्त.

Image
  बोरगावं पोलिसांची धडाकेबाज कामगिरी महाराष्ट्रात बंदी असलेला पंचवीस लाखाचा (तंबाखु) गुटखा केला जप्त.  ----------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  सातारा जिल्हा प्रतिनिधी अमर इंदलकर. --------------------------------  श्री समीर शेख पोलीस अधीक्षक, श्रीमती आंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्रात बंदी असलेल्या (तंबाखु) गुटखा अवैद्यरित्या विक्रीवर, कारवाई करण्याच्या सूचना श्री किरणकुमार सूर्यवंशी उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग सातारा.तसेच श्री.रवींद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक, बोरगाव पोलीस ठाणे यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने बोरगावं पोलीस कार्यतत्पर होते. बोरगावं पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र तेलतुंबडे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली कि, कराड ते सातारा जाणाऱ्या हायवे लेनने गुटख्याची वाहतूक करणारी गाडी जाणार आहे. अशी माहिती मिळताच ते स्वतःआणि गुन्हेशाखा प्रकटीकरणाचे अंमलदार हे बोरगावं पोलीस स्टेशनचे हद्दी मध्ये काशीळ ते नागठाणे हायवे रोड ने पेट्रोलिंग करीत असताना,मौजे अतीत गावच्या हद्दीतील कराड ते सातारा

जिल्हा नियोजन मधील निधीमुळे पोलीस विभागात अत्याधुनिकता - पालकमंत्री, हसन मुश्रीफ.

Image
  जिल्हा नियोजन मधील निधीमुळे पोलीस विभागात अत्याधुनिकता - पालकमंत्री, हसन मुश्रीफ. - ---------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी  शशिकांत कुंभार  ----------------------------------- 3.5 कोटी रुपयांतून कोल्हापूर पोलीस दलाला वाहनांचे हस्तांतरण.  आजच्या आधुनिक काळात गुन्हेगारीत वापरण्यात येणारी वाहने तसेच शस्त्रे यांची तुलना सध्याच्या पोलीस दलातील असणाऱ्या वाहनांबरोबर तसेच शस्त्रांबरोबर केली तर लक्षात येईल की पोलीस विभागाच्या बळकटीकरणाची गरज आहे. यातूनच तत्कालीन अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी जिल्हा नियोजन मधून पोलीस विभागाला निधी देण्याचे ठरवले. त्यामुळे खऱ्या अर्थाने राज्यातील पोलीस विभागाचे बळकटीकरण झाले व त्यांच्यात अत्याधुनिकता आली असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. पोलीस विभागात असणारी वाहने, त्यांच्याकडे असलेली शस्त्रे, त्यांची निवास व्यवस्था तसेच त्यांच्या मुलाबाळांसाठी शाळा चांगल्या प्रकारे पुरवून त्यांची मानसिकता सुदृढ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या सर्व बाबींचा उपयोग कायदा व सुव्यवस्था चांगल्य

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन आयोजित घरोघरी श्रीराम मंदिर या अभिनव संकल्पनेच्या नाव नोंदणी शुभारंभ संपन्न.

Image
  आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशन आयोजित घरोघरी श्रीराम मंदिर या अभिनव संकल्पनेच्या नाव नोंदणी शुभारंभ संपन्न. - -------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत कुंभार  --------------------------------------- दि.०१ ते ०५ जानेवारी पर्यंत नाव नोंदणीची मुदत; शहरातील प्रमुख चौकात नाव नोंदणीसाठी पेंडॉल. कोल्हापूर, ३० : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूरमध्ये राबविण्यात येत असलेल्या घरोघरी श्रीराम मंदिर या संकल्पनेचा नावनोंदणी शुभारंभ सोहळा आज रोजी मिरजकर तिकटी, शेषनाग मंदिरासमोर उत्साहामध्ये संपन्न झाला. सदर सोहळा कोल्हापूरमधील प्रतिष्ठीत महंताच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळयास श्री सद्गुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट, कोल्हापूर व श्री सद्गुरु दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठान, कोल्हापूरचे विद्यमान अध्यक्ष श्री.आनंदनाथ सांगवडेकर महाराज, विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर, कोल्हापूरचे अध्यक्ष श्री.निरंजनदास सांगवडेकर, वेदमूर्ती सुहास जोशी, श्री राघवेंद्र स्वामी मठ

तन्मय कळंत्रे ची सुवर्ण कामगिरी..!

Image
  तन्मय कळंत्रे ची सुवर्ण कामगिरी..! ----------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी  शशिकांत कुंभार  ----------------------------------------- ६७ व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या गुल्फामला नमवत मिळवले गोल्डपदक..! - ⁠- देशातील विविध गटातील 400 स्पर्धकांचा सहभाग. - 44 ते 48 किलो गटात 36 स्पर्धकांमध्ये तन्मय कळंत्रे ठरला अव्वल. व्हनाळी ता. कागल येथील तन्मय सचिन कळंत्रे यांने,राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.नुकत्याच अकोला येथे या स्पर्धा पार पडल्या असून,त्याच्या वयोगटात एकूण 36 स्पर्धकांमध्ये त्यांने अव्वल स्थान पटकावले,तसेच देशभरातून सुमारे विविध वयोगटात 400 पेक्षा जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत उस्फूर्त सहभाग नोंदवला होता. सुवर्णपदक विजेत्या तन्मयची तामिळनाडू येथे होणाऱ्या 2024 "खेलो इंडिया "साठी निवड झाली आहे.त्याच्या या यशाचे पंचक्रोशीसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून कौतुक होत आहे. तसेच त्याच्यावर मित्र परिवाराकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.या राष्ट्रीय पातळीवरील विजयाम

राधानगरी बनाची वाडी येथील वैभव वंजारे याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड.

Image
  राधानगरी बनाची वाडी येथील वैभव वंजारे याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड. --------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे --------------------------------- बनाची वाडी व राधानगरी येथे आनंद उत्सव. राधानगरी तालुक्यातील बनाची वाडी येथील वैभव पांडुरंग वंजारे याची उप पोलीस निरीक्षक पदी निवड झाल्याने राधानगरी व बनाची वाडी मध्ये आनंदाचे     वातावरण पसरले आहे बनाची वाडी येथील शेतकरी कुटुंबांमध्ये असणारा पांडुरंग वंजारे यांचा मुलगा वैभव याने कष्ट करून 2020 स*** एमपीसी परीक्षा दिली परंतु करुणा रोग आल्यामुळे परीक्षा पुढे ढकलली गेली त्यानंतर सण20 21 मध्ये पूर्व परीक्षा दिली त्यानंतर मुख्य परीक्षा सन 20 22 मध्ये दिली त्यानंतर मराठा आरक्षण चे वादळ चालू झाले त्यामध्ये फायनल परीक्षा सन 2023 मध्ये चालू वर्षात मराठा ए डब्ल्यू एस प्र वर्गा मधून महाराष्ट्रात प्रथम माझी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याचे वैभव वंजारे यांनी फ्रंट लाईन न्यूज चे प्रतिनिधी विजय बकरे यांना दिली तसेच हे कष्ट आई व वडील पांडुरंग वंजारे यांच्या कष्टा मुळे व आशीर्वादाने मी एमपीसी परीक्षेत

गगनगिरी ट्रस्ट च्या वतीने पुरस्काराचे वितरण.

Image
  गगनगिरी ट्रस्ट च्या वतीने पुरस्काराचे वितरण. ------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  साळवन प्रतिनिधी   प्रकाश मेंगाणे ----------------------------- किल्ले गगनगडावर दत्तजयंतीनिमित्त तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना गगनगिरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ट्रस्टी रमेशराव माने, शांताराम पाटणकर, संजय पाटणकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा झाला. गगनगिरी विश्वस्त ट्रस्ट, किल्ले गगनगड, गगनबावडा यांच्या वतीने तालुक्यात उत्कृष्ट काम करणारे युवक, शासकीय कर्मचारी, व्यक्ती, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दरवर्षी गगनगिरी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी गगनगिरी पुरस्काराने गौरविलेल्या व्यक्ती अशा : आदर्श युवक : अरुण बंडा पाटील (खेरीवडे), आदर्श कर्मचारी : सुनील जालिंदर ठोंबरे (आरोग्य सहाय्यक), आदर्श प्राथमिक शिक्षक : नामदेव महादेव खाडे (विद्यामंदिर मेडेटेकवाडी), महेश आनंदराव दावणे (केंद्रशाळा विद्यामंदिर सांगशी), आदर्श माध्यमिक शिक्षक : रामचंद्र बापू पाटील (माध्यमिक विद्यालय शेळोशी), तानाजी पांडुरंग घाटगे (यशवंत माध्यमिक विद्यालय असंडोली), गगनगिरी विशेष प

विद्यार्थी औद्योगिक दृष्ट्या तयार असणे काळाची गरज" डॉ. अजित एकल.

Image
 “ विद्यार्थी औद्योगिक दृष्ट्या तयार असणे काळाची गरज" डॉ. अजित एकल. -------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  वाई प्रतिनिधी कमलेश ढेकाणे  --------------------------- "विद्यार्थी औद्योगिक दृष्ट्या तयार असणे काळाची गरज आहे. फार्मा इंडस्टी मध्ये सध्या भारत हा आघाडीवर असणारा देश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंडस्ट्री च्या गरजेनुसार आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करुन तयार असले पाहिजे". असे प्रतिपादन इंन्स्टा व्हिजन, सातारा चे संस्थापक डॉ. अजित एकल यांनी केले. जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या रासायनिक विश्लेषणात्मक साधन पध्दती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झांबरे, अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक, भिमराव पटकुरे, प्रा. उत्तम कांबळे यांची उपस्थिती होती. डॉ. अजित एकल म्हणाले, सध्या बेरोजगारी ही युवकांपुढील मोठी समस्या आहे. रसायनशास्त्रामधून पदवी घेवून स्वतःची

म्हाते ते वेळे रस्त्याचे नित्कृष्ट काम नागरिकांनी पाडले बंद.

Image
  म्हाते ते वेळे रस्त्याचे नित्कृष्ट काम नागरिकांनी पाडले बंद. - --------------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  भणंग प्रतिनिधी   चंद्रशेखर जाधव  --------------------------------------- नित्कृष्ठ कामामुळे वेण्णा दक्षिण भागातील जनता आक्रमक. मेढा,ता.२९: म्हाते ते वेळे या गेल्या अनेक वर्षांपासून खराब असलेल्या रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू असून हे काम अत्यंत नित्कृष्ठ पद्धतीने होत आहे. या सुरू असलेल्या नित्कृष्ठ कामावर आक्षेप घेत वेण्णा दक्षिण भागातील नागरिकांनी हे काम बंद पाडले आहे. हे काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याने तसेच कामाची गुणवत्ता एकदम खराब असल्याने या रस्त्याच्या परिसरातील नागरिक या कामविरुद्ध चांगलेच आक्रमक झाले आहेत. मेढा शहराला व जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या सातारा शहराला वेण्णा दक्षिण भाग जोडण्यासाठी असलेला म्हाते ते वेळे हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब झाला होता. या रस्त्याला बहुतांश ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले होते. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत होता.  सध्या या रस्त्याच्या डांबरीकरणाच

ग्रामसुरक्षा यंत्रणा सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात होणार कार्यान्वित सातारा जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद सातारा यांचा संयुक्त उपक्रम.

Image
  ग्रामसुरक्षा यंत्रणा सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात होणार कार्यान्वित सातारा जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद सातारा यांचा संयुक्त उपक्रम. ----------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  सातारा जिल्हा प्रतिनिधी अमर इंदलकर. ----------------------------------- सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात प्रभाविरित्या ग्रामसुरक्षा कार्यान्वित होणार,आपत्ती काळात नागरिकांना मिळणार तात्काळ मदत.. जिल्हा प्रशासनासाठी संपर्काचे प्रभावी माध्यम ठरणार - मा श्री जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी सातारा* *अतिशय महत्वपूर्ण यंत्रणा चोरी दरोड्याच्या घटनेत चोर होणार तात्काळ जेरबंद.. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक होणार सुरक्षित.. - मा श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा* *ग्रामसभा,सरकारी योजनांची ग्रामस्थांना तात्काळ मिळणार माहिती.. * - *श्री ज्ञानेश्वर खिल्लारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा* मा. जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री.समीर शेख ,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री.ज्ञानेश्वर खिल्लारी यांच्या प्रयत्नातून ,व सयुंक्त विद्यामाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत आज व

भावपूर्ण श्रद्धांजली.

Image
  भावपूर्ण श्रद्धांजली. -------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  -------------------------------- सुरवडी ता फलटण येथील श्रीपती मार्तंड माडकर व व 81 यांचे आज सकाळी वृध्पकाळाने दुखद निधन झाले त्यांच्या पश्चात एक भाऊ दोन मुले नातवंडे असा मोठा परिवार आहे. दैनिक रोखठोक चे संपादक श्री सुरेश माडकर यांचे ते वडील होते माडकर कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत दैनिक सुपर भारत व फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्रच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

विद्या मंदिर कोनोली तर्फे असंडोली(ता. राधानगरी )तालुका स्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत धवल यश.

Image
  विद्या मंदिर कोनोली तर्फे असंडोली(ता. राधानगरी )तालुका स्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत धवल यश. -------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  पन्हाळा प्रतिनिधी   आशिष पाटील  -------------------------- विद्या मंदीर कोनोली तर्फ असंडोली शाळेच्या वतीने समूहगीत व समूहनृत्य या विभागात सादरीकरण करण्यात आले. यामध्ये समूहगीतमध्ये लहान गटातील मुलांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर मोठ्या गटातील मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला. व जिल्हा स्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी होण्याचा बहुमान मिळवला. म्हासुर्ली केंद्रातून जिल्हा स्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी होणाचा बहुमान पहिल्यांदा विद्या मंदीर कोनोली तर्फ असंडोली शाळेला मिळाला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री डी एम पोवार सर यांचे प्रोत्साहन तर संगीत विशारद श्री सुहास पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले. श्री आंनदा गडकर सर, श्री डी एस पाटील सर, श्री आनंदा पाटील सर, सौ. नंदा जाधव मॅडम कु पुजा पाटील मॅडम यांचे सहकार्य लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दीक अभिनंदन करण्यात आले

ग्राहकाच्या अडचणी सोडवण्यासाठी ग्राहकपंचायतने सहकार्य करावे तहसीलदार अनिता देशमुख.

Image
  ग्राहकाच्या अडचणी सोडवण्यासाठी ग्राहकपंचायतने सहकार्य करावे तहसीलदार अनिता देशमुख. ------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ------------------------------ ग्राहकाच्या अडचणी सोडवण्यासाठी ग्राहक पंचायतने सहकार्य करावे असे आव्हान राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या प्रसंगी बोलताना व्यक्त केले .  राष्ट्रीय ग्राहक दिन राधानगरी तहसील कार्यालयातील शाहू सभागृहामध्ये आयोजित केला होता त्यामध्ये प्रथम ग्राहक चळवळीचे जनक बिंदू माधव जोशी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला हा अर्पण करण्यात आला त्यानंतर तहसीलदार श्रीमती देशमुख म्हणाले की ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ग्राहक पंचायतने सहकार्य करावे तसेच ग्राहक पंचायत ची चळवळ ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्या चे सांगून मार्गदर्शन केले या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त राधानगरी शाळेच्या विद्यार्थ्यांची एसटी स्टँड ते तहसीलदार कार्यालया पर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली कार्यक्रमास जिल्हा महिला संघटिका सौ पूनम देसाई जिल्हा उपाध्यक्ष सतीश फणसे ताल

सोशल मीडिया, जाहिरातींच्या भुलथापांना बळी पडू नका : तहसीलदार राजेश चव्हाण.

Image
  सोशल मीडिया, जाहिरातींच्या भुलथापांना बळी पडू नका : तहसीलदार राजेश चव्हाण. -------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  चंदगड प्रतिनिधी आशिष पाटील --------------------------- कोवाड महाविद्यालय, तहसील विभाग, ग्राहक पंचायततर्फे ग्राहक दिन साजरा.    कोवाड (चंदगड ): सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फसव्या जाहिराती व अन्य प्रकार यातून नागरिकांची मोठी फसवणूक होतं आहे. मालाची गुणवत्ता व अन्य बाबी विचारात घेऊन वस्तू खरेदी करा. भुलथापांना बळी पडू नका असे मत चंदगड तहसीलदार राजेश चव्हाण यांनी व्यक्त केले. ते कोवाड येथील कला महाविद्यालय, अखिल भारतीय ग्राहक पंचायत व तहसील विभाग यांच्या ग्राहक दिनच्या संयुक्त कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या एम. एन. पवार उपस्थित होत्या.प्रास्ताविक प्रा. दिपक पाटील यांनी केले. विद्यार्थ्यानी ग्राहक जागृतीसाठी पोष्टर प्रदर्शन केले होते. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष संदीप पाटील म्हणाले ग्राहक हा संज्ञान असला तरी वस्तू खरेदी करताना फसू शकतो त्यामुळे सहजग असलं पाहिजे. असे सांगून ग्राहकांची कर्तव्य व जबाबदार

हलकर्णी कॉलेजमध्ये आंतर महाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन.

Image
  हलकर्णी कॉलेजमध्ये आंतर महाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन. ---------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  चंदगड प्रतिनिधी आशिष पाटील ---------------------------- हलकर्णी( चंदगड ): दौलत विश्वस्थ संस्थेचे हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरूवर्य गुरूनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी (सोमवार दि. १ जानेवारी २०२४ रोजी) सकाळी १० वाजता महाविद्यालयामध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी विविध विषय देण्यात आले असून पाच क्रमांक काढले जाणार आहेत. यामध्ये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे बक्षिसाच्या स्वरूप असणार आहे. या स्पर्धेचे सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे • स्पर्धेचे विषय • १. मातीतल्या सुख-दुःखाला बोलकं करणारा कवी : ना.धों. महानोर २. लोकशाहीचे चार स्तंभ ३. गुरुवर्य गुरुनाथ विद्वान पाटील यांचे जीवन व कार्य ४. नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्याला स्वावलंची बनवेल का ? ५. ISRO : यशस्वी इतिहासाची सुवर्णपाने ६. शिवरायांसि आठवावे   • पारितोषिके • प्रथम क्रमांक: रोख रू: ३००० व सन्मानचिन्ह द्

कॉलेज कुमारीने वाढदिवस साजरा केला विटभट्टी मजुरांसमवेत.

Image
  कॉलेज कुमारीने वाढदिवस साजरा केला विटभट्टी मजुरांसमवेत. ---------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  पंढरपूर प्रतिनिधी  संतोष मोरे  ----------------------------------- पुजा नवगिरे हिने गोड खाऊसह , शालेय साहित्यासह केले साडीचे वाटप आपले कॉलेज शिक्षण घेत असताना आपला दरवर्षीचा वाढदिवस जल्लोषात साजरा न करता वंचित घटकासोबत साजरा करण्याचा आनंद लुटत यंदाचा २१ वा वाढदिवसही चक्क वीटभट्टी कामगार आणि त्यांच्या मुलासमवेत साजरा केला आहे. सदरची कॉलेज कुमारी मुलगी ही पंढरपूर तालुक्यातील जळोली गावची रहिवासी आहे. ती सध्या पुणे येथे स्पर्धा परीक्षासाठी प्रयत्न करीत आहे.        सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी ओबीसी महिला सेलच्या उपाध्यक्षा सविता संजय ननवरे यांची पूजा नवगिरे ही कन्या आहे. आजवर या मुलीने आपला वाढदिवस वेगवेगळ्या वंचित घटकासोबत साजरा करीत आनंद मिळविला आहे.    मागील दोन दिवसापूर्वी आपला २१ वा वाढदिवस जळोली जवळच असलेल्या करकंब येथील राजू शिंदे यांच्या वीटभट्टी वरील गोरगरीब मजूर आणि त्यांच्या चिमुकल्या सोबत साजरा केला. यामध्ये आपल्या वाढदिवसानिमित्त गोड खाऊ, मुलांना शालेय साहित्य

सातारा कमानी हौद परिसरात फायरिंग.

Image
  सातारा कमानी हौद परिसरात फायरिंग.  ---------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  सातारा प्रतिनिधी अमर इंदलकर  ---------------------------- सातारा : सातारा शहरातील कमानी हौद परिसरात मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास सहा जणांच्या टोळीने दोघांना मारहाण करत फायरिंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नसून, परिसर मात्र भीतीने हादरून गेला आहे. दरम्यान, रस्त्यावर आडवी लावलेली दुचाकी बाजूला घे म्हटल्याच्या कारणातून मारहाण करत फायरींग केल्‍याचे समोर आले आहे. धीरज ढाणे, हर्षद शेख (दोघे रा.मंगळवार पेठ, गुरुवार पेठ, सातारा) व अनोळखी चौघे असे हल्लेखोर होते. या घटनेत विशाल अनिल वायदंडे (वय 27, रा. शनिवार पेठ, सातारा) व त्याचा मित्र जखमी झाला आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी, ही घटना (बुधवारी) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. विशाल वायदंडे हा दुचाकीवरून जात असताना हर्षद याने दुचाकी रस्त्यावर उभी केली होती. दुचाकी बाजूला घे म्हटल्याच्या कारणातून दोघांमध्ये वाद झाला. यांनतर हर्षद याने फोन करून त्याच्या साथीदारांना बोलावले. यातून पुन्हा संशयिता

राधानगरी येथील वनक्षेत्रपाल कार्यालय स्थलांतरण केल्यास प्रादेशिक वन विभागाच्या कार्यालयाला टाळेठोक आंदोलन करणार; वनहक्क व संवर्धन कृती समितीचा इशारा.

Image
  राधानगरी येथील वनक्षेत्रपाल कार्यालय स्थलांतरण केल्यास प्रादेशिक वन विभागाच्या कार्यालयाला टाळेठोक आंदोलन करणार; वनहक्क व संवर्धन कृती समितीचा इशारा. ------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी   विजय बकरे -------------------------------  राधानगरी येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या इमारतीमध्ये अनेक वर्षे प्रादेशिक वनविभागाचे कार्यालय कार्यरत आहे.मात्र अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सदरची जागा अपुरी आहे.अशी सबब पुढे करून सदरचे कार्यालय गैबी नाक्याच्या पाठीमागे संरक्षित सागाच्या व निलंगिरी जंगलामध्ये स्थलांतरित करण्याचा त्यांचा मनसुबा आहे.      मात्र राधानगरी तालुक्यातील सामान्य जनतेच्या व स्थानिक रहिवासी यांच्या अडचणी लक्षात न घेता सदरचे कार्यालय गैबी येथे बांधण्याचा घाट घातला आहे.सदरचे कार्यालय राधानगरी पासून ६ किलोमीटर असल्याने गोरगरीब शेतकरी व जनतेची गैरसोय होणार तालुक्यातील इतर सर्व कार्यालये मुख्यालयात असताना फक्त हेच कार्यालय गैबी येथे का? गैबी येथे उभारण्यात येणार असलेले हे प्रादेशिक वन विभागाचे कार्यालय स्थलांतरित न करणेबाबत निर्णय रद्द न झ

नृसिंहवाडी दत्तधाममध्ये पारायण सप्ताहाची सांगता.

Image
  नृसिंहवाडी दत्तधाममध्ये पारायण सप्ताहाची सांगता. ---------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  कुरुंदवाड प्रतिनिधी  ------------------------------ श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम मध्ये दत्तजयंती निमित्त गेले आठ दिवस सुरु असलेल्या सामुहिक श्री गुरुचरित्र वाचन,अखंड नामजप,जप,यज्ञ सप्ताहाची सत्यदत्त पुजन करुन महाआरतीने सांगता करण्यात आली.     सप्ताहाकालात सामुहिक श्री गुरुचरित्र वाचन,२४ तास अखंड नामजप,प्रहर सेवा,श्री गणेश याग,मनोबोध याग,श्री गीताई याग,श्री स्वामी याग,श्री चंडी याग,श्री रुद्र याग,श्री मल्हारी याग तसेच विविध सेवा स्वामी चरणी रुजु करण्यात आल्या.  सकाळी आठच्या भुपाळी आरतीनतंर मान्यवर यजमानांच्या हस्ते श्री सत्यदत्त पुजन करण्यात आले.साडेदहा वा.पुरणाचा नैवेध दाखवुन महाआरती करण्यात आली.यानतंर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.सेवाकेंद्राच्या मुल्यसंस्कार विभागाद्वारे तयार करण्यात आलेली "वृध्दाश्रममुक्त भारत" अभियानावर नाटीका मोठ्या स्क्रीनवर दाखविण्यात आली.   सेवाकेंद्राच्या माध्यमातुन चालविण्यात येणार्‍या विविध अठरा व

शेतकरी संघटनेचा दणका! भीमानगर येथे सर्विस रोड करण्याची नॅशनल हायवेची हमी.

Image
 शेतकरी संघटनेचा दणका! भीमानगर येथे सर्विस रोड करण्याची नॅशनल हायवेची हमी. ------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  टेंभुर्णी/प्रतिनिधी ------------------------------ पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भिमानगर (ता. माढा) येथे सातत्याने अपघात होत असल्याने उजनी कालव्यावरील पूल आणि सर्विस रोड करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी नॅशनल हायवे प्रकल्प व्यवस्थापक सोलापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे एनएचएआय कडून कार्यवाही न झाल्यास राष्ट्रीय महामार्गावर २७ डिसेंबर रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा दिल्यानंतर तात्काळ दखल घेत प्रत्यक्ष पाहणी करून सर्विस रोड आणि उजनी कालव्यावर पूल करण्याची हमी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. राष्ट्रीय महामार्गावरील भिमानगर येथे उजनी व्यवस्थापन कार्यालये, बँक, आठवडे बाजार, उजनी धरण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची सातत्याने वर्दळ असते. नॅशनल हायवेकडून गेल्या काही महिन्यांपूर्वी भिमानगर चौकातील रोड क्रॉसिंग बंद केल्याने नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी गैरसोय होत होती. इंदापूर आणि टेंभुर्णीकडे जाणाऱ्या नागर

मुरगुड येथे रस्त्यासाठीशिवभक्तांचा रास्ता रोको.

Image
  मुरगुड येथे रस्त्यासाठीशिवभक्तांचा रास्ता रोको. --------------------------- फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  मुरगुड/प्रतिनिधी जोतीरामकुंभार ---------------------------  शिवतीर्थ मुरगुड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील अपूर्ण अवस्थेतील रस्त्याची नगरपालिकेने अद्यापही दुरुस्ती केली नाही वेळोवेळी नगरपालिकेस कळवूनही समाधानकारक उत्तर न आल्यामुळे शिवभक्तांनी आणि येथील नागरिकांनी शिव पुतळ्यासमोरील मुख्य रस्त्यावर या मांडून रास्ता रोको आंदोलन केले यामुळे दोन्ही बाजूस बाराच वेळ गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.   येथून जवळच पाच फुटावर असलेल्या मुरगुड नगरपालिका असून देखील सर्वांचे दुर्लक्ष आहे अधिकारी यांच्यासमोर वारंवार अपघात होत असतात तरीदेखील नगरपालिका प्रशासन इकडे दुर्लक्ष करीत आहे या ठिकाणचा रस्ता हा सकल असल्यामुळे अपघाताचे प्रमाण जास्त आहे तरी नगरपालिका प्रशासन लक्ष देणार काय ?आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने केली आहेत लेखी निवेदने सुद्धा दिलेली आहेत.   यावेळी मुख्याधिकारी संजय घार्गे यांनी आंदोलन थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले या वेळी सोमनाथ यरनाळकर ,सर्जेराव भाट, ओमकार पो

मुरगुड प्रिमियम लिग क्रिकेट स्पर्धेत लाल आखाडा संकुल प्रथम.

Image
  मुरगुड प्रिमियम लिग क्रिकेट स्पर्धेत लाल आखाडा संकुल प्रथम. --------------------------------  फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र  मुरगुड प्रतिनीधी जोतीराम कुंभार ------------------------------- सानिका स्पोर्टस् फौंडेशन मुरगुड यांच्या वतीने मुरगूड चे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या मुरगुड प्रिमियम लिग क्रिकेट स्पर्धेतील प्रथम क्रमांक लाल आखाडा संकुल मुरगुड ने पटकावला तर द्वितीय क्रमांक डंग्या स्पोर्टस् मुरगुडने तर तृतीय क्रमांक आराध्या, चतुर्थ क्रमांक आर जे ग्रुप मुरगुड ने मिळवला. क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन मुरगूड पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या शुभहस्ते तर श्री .लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन श्री . किशोर पोतदार, श्री .व्यापारी नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री .किरण गवाणकर, निवास कदम, पांडुरंग कुडवे यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला . तर बक्षीस वितरण गोकुळचे मा.चेअरमन रणजितसिंह पाटील शाहू सहकार साखर कारखाना चे व्हा . चेअरमन मा.अमरसिंह घोरपडे ,राजे बँकेचे चेअरमन मा. एम . पी .पाटील, शाहू साखर कारखान्याचे संचालक मा .सुनील मगदुम, बिद्रीचे मा. व्हा च

पाच जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी मित्रांची झाली ,२३ वर्षांनी एकत्र भेट.

Image
  पाच जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी मित्रांची झाली ,२३ वर्षांनी एकत्र भेट. - ------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  भणंग प्रतिनिधी शेखर जाधव  ------------------------------- मेढा :- तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर येथील डिप्लोमा इन को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट सहकार पदविकेचे सन 2000/01 मधील प्रशिक्षणार्थी यांचा स्नेहसंमेलन सोहळा नुकताच सातारा येथील साई सम्राट लाँन येथे संपन्न झाला 23 वर्षानंतर 45 मित्रांची छत्रपतींची राजधानी सातारा येथे भेट झाली त्यावेळी सर्वांचा आनंद गगणात मावत नव्हता त्यावेळी सर्वांनी मनसोक्त गप्पा मारल्या .गेट टुगेदरच्या निमित्ताने एकत्र आल्याने तब्बल २३ वर्षांनी भेट झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.या गेट टुगेदरचे आयोजन कोपर्डीहवेली (कराड) चे रविंद्र पाटील यांनी केले होते. त्यांना साथ अजित मुळीक, नितिन दनाणे यांनी केली विशेष म्हणजे हे सर्व प्रशिक्षणार्थी मित्र सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होते .एकमेकांचे ओढीने सर्वजण एकत्र आले होते प्रशिक्षण काळातील मित्रांना भेटण्याची इच्छा प

तालुकास्तरीय हस्तलिखित स्पर्धेतबिभवी शाळेचा बोलबाला कायम.

Image
  तालुकास्तरीय हस्तलिखित स्पर्धेतबिभवी शाळेचा बोलबाला कायम. ----------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र भणंग प्रतिनिधी शेखर जाधव  ----------------------------------- . सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तीमत्व विकास स्पर्धेत तालुकास्तर* हस्तलिखित स्पर्धा *( लहान गट ) यामध्ये जिल्हा परिषद प्राथ.शाळा बिभवी ता. जावली यांनी प्रथम संपादन केला असून (मोठा गट ) यामध्ये तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले आहे. लहान गटाचे हस्तलिखित तयार करण्यासाठी सौ. सुनिता कामटे मॅडम यांनी मार्गदर्शन केले त्यांना पालकांनी व बालचमू यांनी सहकार्य केले. त्याबरोबर मोठ्या गटाचे हस्तलिखित तयार करण्यात सौ. दिपाली दुंदळे , सौ. अमिता एरंडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले तसेच बालचमूनी सहकार्य केले .मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर वेंदे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. तालुका स्तरावर प्रथमक्रमांक मिळवून लहान गट हस्तलिखिताची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या यशाबद्दल जावली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. संजय धुमाळ, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. तोडरमल

ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा राधानगरी च्या वतीने विविध मागण्याची निवेदनराधानगरी तहसीलदार यांना सादर.

Image
  ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा राधानगरी च्या वतीने विविध मागण्याची निवेदनराधानगरी तहसीलदार यांना सादर. ----------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र   राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे ----------------------------- ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा राधानगरी यांच्या वतीने विविध मागण्याची निवेदन राधानगरी च्या तहसीलदार यांना देण्यात आले असल्याची माहिती ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा राधानगरी चे अध्यक्ष डीजी चौगुले व संघटक उमेश गायकवाड यांनी दिली ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा राधानगरीयांच्यावतीने हॉटेल मालकांनी भजी वडा बांधून देण्यासाठी जो पेपरचा कागद वापरला जातो त्यापासून आरोग्यास धोका असल्याने त्याऐवजी प्लॅस्टिक कॅरीबॅग वापरण्यात याव्यात व राधानगरी मेन रोडवर एसटी स्टँड वर्णे कॉर्नर अंबाबाई देवालय या तीन ठिकाणी रस्त्यावर स्पीडब्रेकर बसवण्यात यावेत तसेच राधानगरी येथील डॉक्टर मेडिकल किरण दुकान व्यापारी हे जनतेचे 24 तास सेवा देऊन सहकार्य करत आहेत त्यामधील पाच ते दहा व्यापाऱ्यांची निवड करून ग्राहक दिना दिवशी प्रसिद्ध पत्रक देऊन सत्कार करण्यात यावा अशा मागणीची निवेदन राधानगरीच्या तहसीलदार श

राधानगरी तालुक्यामधील दत्त मंदिरामध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

Image
  राधानगरी तालुक्यामधील दत्त मंदिरामध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाली. --------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  राधानगरी प्रतिनिधी  विजय बकरे --------------------------- .दत्त भक्तांनी आज भजन कीर्तन आणि श्री दत्तात्रय चरित्रग्रंथ वाचनाने पावन केला.सकाळपासूनच दत्त मंदिरामध्ये भक्तांची गर्दी होती.    Vo - राधानगरी तालुक्यातील राधानगरी डिगस पिरळपैकीचौगलेवाडी,गुडाळआवळी बुद्रुक,आणाजे,खिंडी व्हरवडे,कसबा तारळे, कुंभारवाडी गावामध्ये दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.आज दत्त जयंतीनिमित्त पिरळ पैकी चौगलेवाडी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते .  राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील दत्त मंदिरात पहाटे साडेपाच वाजता काकडआरती पूजा आरती झाल्यानंतर भक्तांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.दुपारी बारा वाजता नैवध्ये आरती करण्यात आली.खिंडी व्हरवडे येथे दुपारी तीन वाजता गावातून भजन आणि दत्त नामाचा जयघोष करत गावातून दिंडीचे आयोजन करण्यात आले होते गेली सात दिवस ज्ञानेश्वर पारायण आणि तीन दिवसांपासून गुरुचरित्र पारायण घेण्यात आली,यामध्ये महिलांचाह

महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी मा. श्री धनाजीराव बबन आगलावे यांची निवड.

Image
  महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी मा. श्री धनाजीराव बबन आगलावे यांची निवड. - --------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  शाहूवाडी तालुका प्रतिनिधी आनंदा तेलवणकर ---------------------------- शाहुवाडी :महाराष्ट्र नवनिर्माण सेना* संस्थापक अध्यक्ष मा. श्री.राज साहेब ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष नागरगोजे साहेब यांच्या आदेशानु सार तसेच कोल्हापूर.जिल्हा संपर्क अध्यक्ष मा. श्री. जयराज दादा लांडगे साहेब व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा. श्री गजानन जाधव साहेब यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना शाहुवाडी तालुका अध्यक्षपदी मा. श्री. धनाजीराव बबन आगलावे यांची निवड महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना कोल्हापूर  जिल्हाध्यक्ष संजय पाटील*यांनी निवडीचे पत्र देऊन अध्यक्षपदी नियुक्ती केली या कार्यक्रमास उपस्थित कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष युवराज बाबा काटकर नवी मुंबई सानपाडा विभाग अध्यक्ष संजय पाटील साहेब विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष. उपाध्यक्ष. विभाग अध्यक्ष. उपविभाग अध्यक्ष. तसेच महाराष्ट्र सैनिक या सर्वांच्या उपस

दहावीच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस प्रोजेक्टर भेट.

Image
  दहावीच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस प्रोजेक्टर भेट. ------------------------------------ फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  सातारा विभाग प्रतिनिधी सुर्यकांत जाधव  ------------------------------------ सविस्तर मौजे खर्शी बारामुरे येथील न्यू इंग्लिश स्कूल खर्शी बारामुरे इथे 2001/2002 च्या दहावी च्या माजी विद्यार्थी आणी शिक्षकांचा स्नेह संमेलन कार्यक्रम पार पडला . या कार्यक्रमासाठी 2001/2002 मधील मुख्याध्यापक श्री जाधव सर , शिक्षक श्री कुंभार सर , सौ कुंभार मॅडम , श्री खोत सर , श्री डुके सर , श्री कळबंडे सर , श्री कामटे सर तसेच रणावरे मामा , शिंदे मामा , तांबारे मामा हे उपस्थित होते . आजी शिक्षकांमध्ये आत्ताचे न्यू इंग्लिश स्कूल खर्शी बारामुरे चे मुख्याध्यापक श्री कांबळे सर व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते . 2001/2002 दहावी ची पुर्ण बॅच म्हणजेच किरण गायकवाड , किरण गुजर , मोहन यादव , शैलेश यादव , आशिष गोळे , प्रमोद धनावडे , शिवाजी धनावडे , विशाल मोरे, प्रशांत गावडे , प्रकाश बिरामणे , प्रशांत बिरामणे, दिपक गावडे , विवेक फाळके , मयूर गावडे , निलेश गावडे , विजय धनावडे, शुभांगी सुर्वे, जयश्री

कोल्हापूर युवासेना यांच्या वतीने डॉ.विलास पाटील यांना निवेदन.

Image
  कोल्हापूर युवासेना यांच्या वतीने डॉ.विलास पाटील यांना निवेदन. --------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  करवीर प्रतिनिधी रोहन कांबळे  ---------------------------  सारथी, बार्टी, महाज्योतीची पी.एचडी फेलोशिप साठी पुन्हा घेण्यात येणारी १० जानेवारी २०२४ रोजी'ची सीईटी परीक्षा रद्द करुन सरसकट फेलोशिप द्यावी.तसेच या पेपर मधील गोंधळ प्रकरणी संबंधित अधिकार्ऱ्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी युवासेना शिष्ट मंडळानी आज केली होती.      २४ डिसेंबरला आपण जी अन्यायी सीईटी परीक्षा घेतली ती इतिहासातील जिझिया सारखी होती . परीक्षा घेण्याचं आपल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी घोषित केलं पण आपल्या अधिकारी वर्गाला साधी नवीन प्रश्नपत्रिका तयार करता आली नाही म्हणून सेटची जुनी प्रश्नपत्रिका आहे तशी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी देण्यात आली आणि अनेक परीक्षा केंद्रांवर ज्या प्रश्नपत्रिका आल्या त्या बंद न करता लिफाफामधुन सील नसलेल्या प्रश्नपत्रिका होत्या अशी अनेक विद्यार्थ्यांकडून तक्रारी होत्या. यामुळे ही परीक्षा रद्द केली. यामुळे १० जानेवारी २०२४ रोजी ही सीइटी परीक्षा पुन्हा घेवून सरकार क

मुरगूडमधे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

Image
  मुरगूडमधे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.  --------------------------------- फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र  मुरगूड प्रतिनीधी जोतीराम कुंभार  ---------------------------------  मुरगूड येथील तरुणाने चार दिवसापूर्वी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले अनिकेत भिमराव कांबळे वय २८ रा. सरपिराजी रोड मुरगूड असे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजले नाही या घटनेची नोंद मुरगूड पोलिसात झाली आहे. रविंद्र पाटील यांच्या राधानगर -निपाणी रस्तालगत असणाऱ्या शेतामधे विहिरीच्या काठावर असणाऱ्या झाडाच्या फांदीस दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली २२ तारखेस झालेल्या या घटनेनंतर मृतदेह सडलेल्या अवस्थेत निदर्शनास आले. रात्री उशिरा या प्रेताची ओळख पटली. रविंद्र पाटील यांनी या घटनेची वर्दी दिली. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल कंभार करीत आहेत.