नागबर्डी देवस्थानाच्या विकास कामांचा खा. चिखलीकरांनी घेतला आढावा.
नागबर्डी देवस्थानाच्या विकास कामांचा खा. चिखलीकरांनी घेतला आढावा.
--------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
नांदेड प्रतिनिधी
-------------------------------------------
नांदेड : कंधार तालुक्यातील नागबर्डी येथील देवस्थानाच्या विविध विकास कामांचा खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज आढावा घेतला. या बैठकीस भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कंधार तालुक्यातील नागबर्डी येथील प्रसिद्ध देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी यापूर्वीही करोडो रुपयांचा निधी खेचून आणला. येथे मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देताना शाश्वत विकासाच्या अनुषंगाने ही त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. साडेतीन कोटी रुपयांपेक्षा ही जास्त किमतीचे विकास कामे येथे सध्या मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे या कामाच्या संदर्भात खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आढावा बैठक घेऊन परिस्थिती जाणून घेतली. सर्व कामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण कराव्यात अशा सूचनाही खा. चिखलीकर यांनी यावेळी संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीस भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा लोहा विधानसभा प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजीराव बच्चेवार, किशोर देशमुख, तहसीलदार राम बोरगावकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेशराव पाटील सावळे, प्रकाश तोटावाड, सुभाष गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment