डॉ. वरूण बाफना व फार्मासिस्ट एम.एम.चव्हाण परिवर्तन फाउंडेशन तर्फे धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित.

  डॉ. वरूण बाफना व फार्मासिस्ट एम.एम.चव्हाण परिवर्तन फाउंडेशन तर्फे धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित.

---------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

---------------------------------------

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसिन विभाग प्रमुख डॉ.वरूण बाफना तसेच छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय सी.पी.आर. हॉस्पिटलचे मुख्य औषध निर्माण अधिकारी एम. एम. चव्हाण यांनी ३७ वर्षे औषध निर्माण अधिकारी म्हणून सेवा केली आहे, एम.एम. चव्हाण सेवानिवृत्त होत असून औषधनिर्माण क्षेत्रातील बहुमुल्य योगदानाबद्दल त्यांना परिवर्तन फाउंडेशन च्या वतीने जीवन रक्षक, धन्वंतरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. प्रकाश गुरव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी इ.एन.टी. विभागप्रमुख डॉ. अजित लोकरे, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष बाजीराव कांबळे, परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळवी,मुकादम बाळासाहेब कवाळे,राज कुरणे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.