चोरीस गेलेली वाहने पोलिसांनी केली जप्त.
चोरीस गेलेली वाहने पोलिसांनी केली जप्त.
---------------------------
परभणी/प्रतिनिधी
---------------------------
स्थानिक गुन्हे शाखा, शहर वाहतूक शाखा व पोलीस ठाण्याच्या वतीने नाकाबंदी दरम्यान संयुक्त तपासणी मोहीम राबवून चोरीस गेलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांनी शहरात चोरी वाहनांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याच्या सुचना व आदेश स्था.गु.शा. व शहर वाहतूक शाखेस दिले होते.
त्याअनुषंगाने दिनांक 6 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत परभणी शहरातील पोलीस ठाणे नवामोंढा, कोतवाली, नानलपेठ हद्दीत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. शहरामध्ये प्रवेश करणाऱ्या मुख्य मार्गांवर नाकांबदी करण्यात आली.
नाकाबंदी दरम्यान विसावा फाटा येथे हिरो ड्युएट या दुचाकी मध्ये चाकु आढळल्याने राम हनुमान चौकट (रा. सारंगपूर, ता. जि. परभणी) याच्याविरूध्द नानलपेठ पोलीस ठाण्यात कलम 135 म.पो. का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दुचाकी चालवत असताना दुचाकीचे मालकी हक्क नसलेले व बनावट नंबर टाकुन कागदपत्रांबाबत उडवाउडवीचे उत्तरे देणारे शेख मोहसीन गुलाब (वय 27 वर्षे, रा. माटेगांव, ता.पुर्णा ), पठाण आवेज गफारखान (वय 23 वर्षे, रा. नेहरू चौक, गंगाखेड) या दोन इसमांविरुध्द देखील पोलीस ठाणे नानलपेठ येथे कलम 124 म.पो. का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परभणी, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, पुणे येथुन चोरीस गेलेले 7 वाहने नाकाबंदी दरम्यान मिळुन आल्याने वाहन ताब्यात घेण्यात आलेली आहेत. तसेच कागदपत्रे नसलेली व संशयीत 10 वाहने ताब्यात घेवुन वाहन चालविणाऱ्या इसमांकडे कागदपत्रे तपासणी करण्याची कार्यवाही चालु आहे. चोरीची वाहने मिळुन आलेल्या इसमांकडे स्थागुशा चे पथकामार्फत पुढील तपास चालू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. व अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा,चे पो.नि.वसंत चव्हाण, श.वा.शा.चे स.पो.नि. वामन बेले, स.पो.नि.श्री.पी. डी. भारती, पोउपनि बिरादार, पोलीस अंमलदार निलेश कांबळे, बाळकृष्ण कांबळे, प्रशांत वाहुळे व परभणी शहरातील अधिकारी यांनी मिळून केली.
पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांचे कडून नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे की, जुने वाहन खरेदी करताना वाहनाच्या कागदपत्रांची पडताळणी करूनच वाहन खरेदी करावे.
Comments
Post a Comment