Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

समावेशक सामाजिक विकास संस्थेतर्फे संविधान साक्षरता जन जागृती अभियान.

 समावेशक सामाजिक विकास संस्थेतर्फे संविधान साक्षरता जन जागृती अभियान.

  

मेढा प्रतिनिधी :- समावेशक सामाजिक विकास संस्था औंध ही सामाजिक नोंदणीकृत संस्था असून सन 2016 साली भटक्या विमुक्त समूहातील उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांनी एकत्र येवून संस्थेची स्थापना केली. भारतीय संविधानातील न्याय, स्वतंत्र, समानता, बंधुता आदी मुल्यांचा तसेच मुलभूत हक्क आणि अधिकारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी विमुक्त जाती भटक्या जमाती दलित आदिवासी समुदायातील लोकांच्या सोबत काम करते आहे. ह्यासोबतच संस्था शिक्षण आरोग्य उपजीविका लिंगसमभाव जन जागृती, महिला व युवकांची क्षमता बांधणी विकास तसेच स्थानिक स्वःशासनामध्ये लोकांचा सहभाग वाढविणे याविषयावर काम करते महाराष्ट्र निवडणूक अधिकारी व शासनाच्या विविध विभागासोबत समन्वय करून सातारा जिल्ह्यातील सातारा, खटाव, कराड, जावळी, वाई तालुक्यातील 48 गावात संस्थेचे काम सुरु आहे याचाच एक भाग म्हणून 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर २०२३ जागतिक महिला महिला हिंसाचार विरोधी पंधरवाडा व संविधान साक्षरता जन जागृती अभियान राबवत आहे. जगभरात २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय महिला हिंसाचार विरोधी पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो. 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत Invest to Prevent Violence against Women & Girls #NoExcuse 16 दिवसांच्या सक्रियतेची जागतिक थीम आहे. सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आपल्या समाजातील परिस्थिती सुधारण्याच्या दिशेने प्रगती होत असली तरी या आव्हानात्मक समस्येला ताँड देण्याची जबाबदारी आता आपली आहे. सद्याची परिस्थिती पाहता महिलांच्या बाबतीत भयानक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. याबाबत सर्व ठिकाणी महिलांच्या हिंसेबाबत विरोध केला पाहिजे. घटना अशा आहेत ज्या उघड होत नाहीत महिला व मुलीनां कायद्याची माहिती, योग्य सल्ला तसेच महिला व मुलींसाठी सामाजिक पोषक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. संविधानिक हक्क अधिकार याविषयी माहिती समाजापर्यंत पोचवण्याची आवश्यकता आहे.त्यासाठी आँध सातारा या संस्थेतर्फे  दि 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2023 रोजी जागतिक महिला हिंसाचार विरोधी पंधरवडा व संविधान साक्षरता जन जागृती अभियान राबविण्यात येणार असलेची  माहिती जावली - वाई तालुका समन्वयक सिमा रवी ढोणे यांनी दिली

Post a Comment

0 Comments