मौर्य क्रांती महासंघ च्या वतीने आदर्श ग्राम ढोरखेडा येथील सरपंच यांचा विशेष सन्मान.
मौर्य क्रांती महासंघ च्या वतीने आदर्श ग्राम ढोरखेडा येथील सरपंच यांचा विशेष सन्मान.
-----------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
रिसोड प्रतिनिधी
रणजित ठाकुर
-----------------------------------------
मौर्य क्रांती महासंघ एक सामाजिक संघटन असून समाजात सांस्कृतिक,सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या समाजमन प्रगल्भ व्हावी तसेच लक्षभेदि जागृती व्हावी उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .जेजुरी येथे झालेल्या दोन दिवसीय धनगर जागृती परिषदेत मौर्य क्रांती महासंघ सत्यशोधक विचाराचे अनुयायी मारोतराव पिसाळ यांच्या स्मरणार्थ सप्त खंजिरी वादक यांना सत्य शोधक समाज प्रबोधनकार पुरस्कार तर, राष्ट्रीय समाज कर्मचारी फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष शिद्धापा आक्किसागर यांना सत्य समाज प्रवाहक हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आदर्श ग्राम ढोरखेडा तालुका मालेगाव जी वाशिम येथील सरपंच सौ सूनीताताई बबनराव मिटकरी यांना गावचा सर्वागीण विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून आपल्या गावाला महाराष्ट्राच्या नकाशावर आणलं आणि आपल्या गावाला आदर्श ग्राम म्हणून ओळख निर्माण करून दिली त्याबद्दल त्यांना मौर्य क्रांती महासंघा च्या वतीने सन्मानपत्र आणि ट्रॉफी असा विशेष सन्मान देऊन गौरवण्यात आले.विवीध क्षेत्रातील मान्यवर आरोग्य,शिक्षण,पत्रकारिता,उद्योजक,या क्षेत्रांतील नामवंताचा सन्मान करण्यात आला.या सत्रात महाराष्ट्रातील नामवंत अभ्यासक उद्योजक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमाची अध्यक्षता मौर्य क्रांती महासंघ चे संस्थापक अध्यक्ष बलभीमजी माथेले यांनी केली.सूत्र संचालन उपाध्यक्ष यांनी तर आभार संतोष गावडे यांनी केले.
मौर्य क्रांती महासंघ आयोजित 2 रे राज्य अधिवेशन तथा धनगर जागृती परिषदेचे आयोजन दि.26 नोव्हेंबर व 27 नोव्हेंबर 2013 रोजी जेजुरी तालुका पुरंदर जी पुणे येथे करण्यात आलेल्या या परिषदेसाठी वाशिम जिल्हा अध्यक्ष विठ्ठल गोरे,विदर्भ प्रभारी राजकुमार नव्हाळे,शिवाजी वैद्य,गणेश गावंडे,भगवान कोल्हे,अरुण डांगे, सामाजिक कार्यकर्ते बबनराव मिटकरी यासह महराष्ट्रातील मौर्य क्रांती महासंघ चे राज्य अध्यक्ष राजीव हाके ,राज्य प्रभारी उत्तम कोळेकर,तुकाराम जानकर ,सत्यवान दुधाळ, हणमंत दवंडे तसेच सर्वच विभागिय प्रभारी , जिल्हा प्रभारी हितचिंतक तसेच मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment