सध्याच्या युगात महिलांचीच आघाडी.

 सध्याच्या युगात महिलांचीच आघाडी.

---------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी 

रणजित ठाकुर 

---------------------------------------------

रिसोड : सध्याचे युगात महिलाही प्रत्येक क्षेत्रात आता पुरुषांप्रमाणे आपले योगदान देत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपले कर्तव्य बजावत आहेत. असेच एक उदाहरण रिसोड शहरात पाहायला मिळत आहे. अत्यंत अवघड, धोकादायक असं क्षेत्र असलेल्या महावितरण कंपनीमध्ये कार्यरत एक महिला कर्मचारी सध्या चर्चेचा विषय आहे. महावितरण मध्ये रिसोड शहरातील शिवाजीनगर भागात कर्तव्यावर असलेल्या अश्विनी चाटे, तंत्रज्ञ, रिसोड शहर शाखा. ह्या सध्या या भागात चर्चेत आहे.पुरुष लाईनमन प्रमाणेच धावपळ करून विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नेहमीच तत्परता दाखवत असतात. स्वतः खांबावर डीपीवर चढून अत्यंत शिस्तबद्ध  आपले कर्तव्य बजावत आहेत. विद्युत पुरवठा खंडित झाला तर तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता अश्विनी चाटे या आपल्या कार्याला प्रथम प्राधान्य देऊन स्वतः लक्ष घालून स्वतः विद्युत कामे करत आहेत. यामुळे त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.