कलीवडे-धनगरवाड्यास मायेची ऊब देऊन दुर्गवीरने केली.
कलीवडे-धनगरवाड्यास मायेची ऊब देऊन दुर्गवीरने केली.
-------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
चंदगड प्रतिनिधी
आमृत गावडे.
-------------------------
आनंदाची दिवाळी...
आनंदाची दिवाळी या उपक्रमाअंतर्गत दुर्गवीर प्रतिष्ठान मार्फत गेली अनेक वर्ष गड घेऱ्यातील भौतिक सुख सोईनपासून वंचीत घटकाला मदत करत आलीय. तसेच किल्ले कलानिधीगडावर गेल्या 8 वर्षापासून चंदगड-बेळगावचे दुर्गवीर गड संवर्धनाचे काम करतात. या अनेक वर्षात अफाट काम दुर्गवीरांनी केलं.
यंदाही आनंदाची दिवाळी या उपक्रमा अंतर्गत कलीवडे-धनगरवाडा ता.चंदगड जी.कोल्हापूर येथील लहान मुलांना स्वेटर वाटप करण्यात आले. हा वाडा किल्ले कलानिधीगडाच्या पायथ्याला गर्द जंगलात वसलेला आहे. जून पासून ते अगदी मार्च पर्यंत या भागात प्रचंड थंडी असते आणि याचाच भान राखून आम्हा दुर्गवीरांनी शुक्रवार दि.२४ नोव्हेंबर २०२३ रोजी स्वेटर वाटप करण्यात आले.
या वाटपावेळी दुर्गवीर प्रतिष्ठान चे संस्थापक-अध्यक्ष श्री.संतोष हसुरकर, कोल्हापूर प्रमुख श्री.संदीप गावडे, तालुका प्रमुख श्री.कृष्णा सुप्पल आणि चंदगड-बेळगाव चे इतर दुर्गवीर उपस्थित होते. वाड्यावरील ग्रामस्थांकडून दुर्गवीरचे आभार व्यक्त करण्यात आले.
Comments
Post a Comment