रोहित पवार यांच्या संघर्षयात्रेचे जल्लोषात स्वागत.
रोहित पवार यांच्या संघर्षयात्रेचे जल्लोषात स्वागत.
-------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
परभणी प्रतिनिधी
-------------------------------
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांवर अहमदनगर जिल्ह्यातील चोेंडी येथून सुरू केलेली युवा संघर्ष यात्रा देवगाव फाटा मार्ग परभणी जिल्ह्यात रात्रौ सव्वा आठ वाजता दाखल झाली.तेव्हा यूवा नेते अजयराव गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली हजारो यूवकांनी या यात्रेचे जल्लोषात स्वागत केले.
आमदार पवार यांची ही संवाद यात्रेने लगेच चारठाण्याकडे तेथून प्रस्थान केले.त्यावेळी अजयराव गव्हाणे व त्यांचे कार्यकर्ते ही पदयात्रेत सहभागी होते. त्यावेळी त्यांचे युवा नेते अजय गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते चारठाण्यात यात्रेसोबत चारठाण्यात मुक्कामी असणार आहे.दुसर्या दिवशी सकाळी 6 वाजता आमदार पवार यांची ही यात्रा मालेगाव मार्गे प्रस्थान करणार असून या यात्रेत अजय गव्हाणे व त्यांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी आसतील.
दरम्यान या यात्रेचे रात्री उशिरा चारठाणा फाट्यावर शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी स्वागत केले. माजी आमदार विजय भांबळे, प्रेक्षा भांबळे व अन्य पदाधिकारी यांनी यात्रेचे जोरदार स्वागत केले.
उद्या जिल्ह्यातील पारंपारिक कला सादर करणारे कलावंतसुध्दा यात्रेबरोबर सहभागी होणार आहेत. मालेगावात खासदार श्रीमती फौजिया खान, आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अॅड. विजय गव्हाणे, शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील हे यात्रेचे स्वागत करणार असून ते जिंतूर पर्यंत या यात्रेत सहभागी असणार आहेत. जिंतूर शहरातील आगमनानंतर संवाद यात्रा रात्री सभा आटोपून मानकेश्वरला मुक्कामी राहणार आहे.
Comments
Post a Comment