तडीपार गुंड साहिल रुस्तुम शिकलगार यास हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी बोरगाव पोलिसांनी केली कारवाई.

 तडीपार गुंड साहिल रुस्तुम शिकलगार यास हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी बोरगाव पोलिसांनी केली कारवाई.

विविध गुन्ह्यात नाव असलेला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार केला गेलेला गुंड साहिल रुस्तुम शिकलगार हा दिनांक 5/11/2023 रोजी मौजे नागठाणे तालुका जिल्हा सातारा येथील उरमोडी नदीच्या पुलाजवळ पहाटे 5 च्या सुमारास बोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक श्री प्रशांत प्रल्हाद नाईक यांना आढळून आल्याने हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक कार्यालय सातारा यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्याचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 142 प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर तक्रार- कारवाई करण्यात आली आहे.सातारा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल,मा. उपविभाग पोलीस सो. किरणकुमार सूर्यवंशी.यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बोरगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र तैलतुबडे यांच्या  मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली असून अधिक चा तपास पोलीस हवालदार श्री सावंत. (बक्कल नंबर 498)  हे करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.