युवा संस्थेचे वंचीतांची दिवाळी गोड कार्यक्रम कौतुकास्पद: डॉ. संदीप हजारे.
युवा संस्थेचे वंचीतांची दिवाळी गोड कार्यक्रम कौतुकास्पद: डॉ. संदीप हजारे.
------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
गोकुळ शिरगाव प्रतिनिधि
------------------------------------
स्थंलातरीत कामगाराच्या मुलांना दिवाळी भेट.
युवा ग्रामीण विकास संस्थेचे मोफत आरोग्य शिबिरातून एचआयव्ही/ एड्स, गुप्तरोग, क्षयरोग, कावीळ, जनजागृतीचे उपक्रम दिशादर्शक आहेत. स्थंलातरीत कामगाराच्या मुलांच्यासाठी वंचीतांची दिवाळी गोडसारखे कार्यक्रम कौतुकास्पद आहेत. असे प्रतिपादन यशवंत सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. संदीप हजारे यांनी केले.
गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील आरोग्य प्रतिबंध विभाग, स्थंलातरीत कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्पाच्या वतीने स्थंलातरीत कामगाराच्या मुलांना दिवाळी भेट कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी श्री.करवीर निवासिनी महालक्ष्मी कुरिज प्रा.लीचे संचालक डॉ. दत्तात्रय तोरस्कर, ग्रामसेवक दत्तात्रय धनगर, एस राजू माने, प्राथमिक शिक्षिका पूनम भोपळे, शिवतेज उद्योग समूहाचे अध्यक्ष संजय शिंदे, बाल वक्ता रेहान नदाफ, साई भक्त सुधीर घुगरे, गजानन नायकुडे, रामा कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी उपक्रमातून वाय.आर. जी. केअर या संस्थेने नुट्रेशन फुड्स दिले. यासाठी प्रकल्प व्यवस्थापक पिराजी तोडकर यांचे सहकार्य लाभले.
प्रास्ताविक प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते यांनी व स्वागत समुपदेशक प्रल्हाद कांबळे यांनी केले.
कार्यक्रमास प्रकल्प संचालक नंदकुमार निर्मळे, दिशा सीपीआरच्या कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर, सुनील पाटील,सामाजिक कार्यकर्ती दिपाली सातपुते, प्रियदर्शनी स्वामी, फातिमा मुल्ला, शिवप्रसाद पाटील, प्रदीप आवळे, सचिन कांबळे, उदय कांबळे, पिअर लीडर, स्टेक होल्डर, मण्यांक भोपळे,पी. एम. सी कमिटी संचालक, यांचे सहकार्य लाभले.आभार प्रदीप आवळे यांनी मानले.
Comments
Post a Comment