गांधीनगर डीबी पथकाची कौतुकास्पद कामगिरी: मुद्देमालासह सहा गुन्हे उघडकीस.

 गांधीनगर डीबी पथकाची कौतुकास्पद कामगिरी: मुद्देमालासह सहा गुन्हे उघडकीस.

गांधीनगर : गांधीनगर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या सहा  चोऱ्यांचा  तपास अवघ्या काही दिवसातच लावला. सदर आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करत त्यांना गजाआड केले.

घोरपडे गल्ली उंचगाव येथे राहणाऱ्या अमनकुमार नरेशसिंग यांच्या पाठीमागील पॅन्टच्या खिशातून विशाल विजय छाबडा या चोरट्याने विवो कंपनीचा मोबाईल चोरून नेला होता. या चोरीचा तपास अवघ्या काही दिवसांत लावून आरोपीसह मुद्देमाल ताब्यात घेतला. 

गांधीनगर बस स्टॉपवर असलेल्या शगुन लेडीज वेअर दुकानात राजेश भजनलाल काडीळा या व्यापार्याची बॅग हातोहात लंपास करणाऱ्या रमेश बाबुराव डिकुळे, रा. घोटी ता. करमाळा या चोरट्यास मुद्देमालासह 24 तासात ताब्यात घेतले. 

मनेरमाळ साईनाथ कॉलनी येथे राहणारे सतिश विलास पांचगे यांनी दि 13/10/2023रोजी आपल्या दारात लावलेली हिरो होंडा स्प्लेंडर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्या चोरीचा तपास अवघ्या पाच दिवसांत तपास करत आरोपीसह मुद्देमाल ताब्यात घेतला. 

स्वामी दयानंद स्पिनिंग मिलच्या डाव्या बाजूला असलेल्या शेतातून नामदेव आनंदा पवार,विजय शंकर पवार,अमर शामराव पवार यांनी पॉली कॅब केबल चोरुन नेली होती. त्यांना मुद्देमाल सह ताब्यात घेतले.

. गांधीनगर बाजारपेठेत खरेदीस आलेल्या सौ रोहिणी जयवंत काळे (राहणार आटके, ता. कराड, जि. सातारा) यांची दहा हजार आठशे रुपये मुद्देमाल असलेली लेदर बॅग चोरणाऱ्या  सारिका दत्तू सकट व ज्योती आकाश हाताळगे (दोघीही रा. कागवाड, ता. अंकली, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक) यांना गांधीनगर पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाने अटक केली. गुन्हा रजिस्टर नंबर,266/2023 या गुन्ह्यातील फरारी असलेला आदित्य भिमराव दिडे रा. राजारामपुरी हा गेली चार महिन्यांपासून फरारी होता. त्याचा गांधीनगर डीबी पथकाने कसोशीने तपास करत आरोपीला अटक केली. 

पोलीस अधीक्षक महेन्द्र पंडीत  अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई करवीर उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील नेतृत्वाखाली गांधीनगर डिबी पथकातील हेड कॉन्स्टेबल,बजरंग हेबाळकर,संतोष कांबळे, संदीप कुंभार, रोहन चौगले,  सचिन सावंत यांनी  सहा गुन्हे उघडकीस आणून गांधी नगर डिबी पथकाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.