दारू धंद्याच्या जीवावर माज करणाऱ्या व महिलांना छेडणाऱ्यावर कारवाई करणार का ?

 दारू धंद्याच्या जीवावर माज करणाऱ्या व महिलांना छेडणाऱ्यावर कारवाई करणार का ?

---------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा विभाग प्रतिनिधी 

सूर्यकांत जाधव 

---------------------------------------------

सहाय्यक पोलीस निरीक्षक मेढा यांना निवेदनाद्वारे किरण बगाडे यांची मागणी.

सविस्तर :-कुडाळ जावली येथे

बेकायदेशीररित्या  साखर कारखान्याच्या गेटवर सह्याद्री हॉटेलवर खुल्याने दारु विक्री सुरू आहे अनेक वेळा निवेदन आंदोलन सामाजिक संघटनांनी करूनही संबंधित पैशाचा माज असणाऱ्या हॉटेलमधील आचारी व मालक यांच्यावर कारवाई करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक मेढा यांना निवेदन देण्यात आले.

सदर हॉटेल सह्याद्रीमध्ये भांडी घासण्यासाठी नेवेकर वाडी मधील एक महिला कर्मचारी शंभर रुपयांच्या बोलीवर कामाला होती मात्र हॉटेल सह्याद्रीमध्ये काम करत असताना सदर हॉटेलमधील आचारी असशील नजरेने हातवारे करणे तिच्याशी लगट करणे हा प्रकार करत होता मात्र कायद्याची भीती नसणाऱ्या या आचाऱ्याने 23/11/2023 रोजी सायंकाळी 4:30 वाजता सदर महिलेला फोन करून  हॉटेलवर बोलावले महिलेच्या अंगावर हात टाकण्याचं षडयंत्र रचले मात्र सदर बाब महिलेने पतीला व दिराला सांगितली 

सदर आचारी याने ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुला ठार मारीन अशी धमकी दिली त्यामुळे सदर महिला भयभीत झाली या महिलेला हॉटेल मालक विक्रांत पवार यांनीही पोलीस स्टेशनला तक्रार केलीस तर तुझ्याकडे बघतो असा दम देऊन महिलेला शांत करण्याचे काम केले मात्र महिलेवर हात टाकणाऱ्या आचाऱ्यावर तसेच सदर महिलेला दमदाटी करणाऱ्या हॉटेल मालकावर कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असा ईशारा किरण बगाडे यांनी दिला त्यावेळी निवेदन देताना जिल्हा सचिव किरण बगाडे धनाजी शिर्के संतोष शिर्के व प्रतीक्षा शिर्के हे उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.