३५०० रु. दरासाठी मुरगूड येथे राजू शेट्टी यांचा भव्य शेतकरी मेळावा.

 ३५०० रु. दरासाठी मुरगूड येथे राजू शेट्टी यांचा भव्य शेतकरी मेळावा.


----------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगूड प्रतिनीधी

जोतीराम कुंभार

----------------------------------

मी तुमच्याकडे मोठ्या आशेन आलोय-- माजी खास राजू शेट्टी

 आम्ही ४०० रुपये साठी आंदोलन करतो पण यांना दया नाही कारखानदार म्हणतात की आम्हाला विचार करायला अवधी द्या आणखीन किती दिवस म्हणून नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही म्हणतात तेच खर आज मी तुमल्याकडे मोठ्या आशेन आलोय कागल तालुक्यात एकही वाहन रस्थावर दिसनार नाही  तुमच खर रुप दाखवाल तरच तुम्हाला मागील रू ४०० व चालू उसाचा दर३५०० मिळणार आहे.

   मुरगूड ता. कागल येथे भव्य शेतकरी मेळावा गुरुवार दि 16 रोजी संपन्न झाला प्रथम छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेच पूजन शेतकरी बांध वांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते संपन् झाले .यावेळीअध्यक्ष् स्थानी सदाशिव भारमल हे होते त्याच्या हस्ते माजी खास. राजू शेट्टी यांचा यथोचीत सत्कार करण्यात आला. तसेच अजित पवार यांचा सत्कार राणोजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सागर कोंडेकर व नामदेवराव भराडे, सागर शेटे  यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला

       जिल्हा अध्यक्ष सागर कोंडेकर म्हणाले ऑगष्ट महिन्यात ४०० रू ची मागणी केली होती आता मुख्य लढा आहे तो ४०० रुपयांचा आता तुमची ही गट्टी जमनार नाही असेही ते म्हणाले कार्य कर्त्यावर तुम्ही गुन्हे दाखल करता  काय चाललय तुमच आम्ही रस्त्यावर आलो म्हणून आम्ही काय दरोडेखोर आहे काय तुम्ही जिल्ह्याचे पालकत्व घेतलय मग आम्ही काय करायच चांगल काम करा चांगला दर दया असाही सवाल त्यांनी केला. 

 यावेळी मारूतराव चौगले, नामदेव भराडे, महाविर मगदुम हमिदवाडा, संपत पाटील निढोरी, शिवाजी कळमकर, परशुराम कदम मत्तीवडे, मायकेल बरदेस्कर, सचिन खोत निप्पाणि, भागवत शेटके, पांडूरंग आडसुळ मळगे खु, जोतीराम सुर्यवंशी मुरगूड, बाळासाहेब पाटील तालुका अध्यक्ष, तानाजी मगदुम ता. अध्यक्ष यांची मनोगते झाली. यावेळी शेतकरी मोठ्या संखेने उपस्थीत होते.

    प्रास्तावीक  समाधान हिंदळकर यानी तर सुगमंचालन अनिल पाटील यांनी केले शेवटी बबन बाबर यांनीआभार मानले.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.