Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विश्वंभरबाबा कार्तिकी पायी दिंडी सोहळ्याचे २ डिसेंबरला आळंदीला प्रस्थान.

 विश्वंभरबाबा कार्तिकी पायी दिंडी सोहळ्याचे २  डिसेंबरला आळंदीला प्रस्थान.

------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

भणंग प्रतिनिधी

चंद्रशेखर जाधव

------------------------------------------

 भणंग प्रतिनिधी :-!! चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहु !! 

सालाबाद प्रमाणे ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजरात जावळीची राजधानी मेढा येथुन आळंदी कडे  दिंडी सोहळ्याचे प्रस्थान होणार असलेची माहीती ह भ प गुरूवर्य अतुल महाराज देशमुख गांजे यांनी सांगीतले आहे  वै. ह भ प गुरुवर्य भिकोबा महाराज देशमुख यांनी ६२ वर्षापूर्वी सुरू केलेल्या पायी दिंडी सोहळ्यास या वर्षी  ६३ वर्ष पूर्ण होत आहेत अविरतपणे चालू असणारा मेढा ते श्री क्षेत्र आळंदी कार्तिक पायी वारी दिंडी दि.२ डिसेंबर  रोजी मेढा येथून प्रस्थान करणार असून भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ह भ प गुरूवर्य अतुल महाराज देशमुख गांजे यांनी केले आहे.या दिंडी सोहळ्यास सचिव भजन सम्राट तुकारामजी देशमुख व अंचना भोसले यांचे ही मोलाचे सहभाग असतो.

छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या मामुर्डी येथुन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाला प्रदक्षीणा घालून केदारेश्वर भजन मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ मामुर्डी यांच्या कुशल मार्गदर्शनात सकाळी ९ वाजता विठ्ठल मंदिरातुन दिंडी निघते तसेच त्याच वेळेत गांजे गाव येथुन सुद्दा दिंडी मेढा या दिशेने निघते.आणी या दोन्ही दिंड्या मेढा येथे श्री विठ्ठल मंदिर मेढा येथे येतात  त्यानंतर विठ्ठल मंदिरातुन दिंडी आळंदीकडे प्रस्थान करते जावली तालुक्यातील अध्यात्माची, भागवत संप्रदायाची परंपरा कायम रहावी, सांप्रदायची आवड निर्माण व्हावी यासाठी वै.भिकोबा महाराज देशमुख गांजे यांनी  गावोगावी अखंड हरिनाम सप्ताह (पारायणे) कार्य सुरू केले. सुरुवातीच्या काळात त्यांच्या धर्मपत्नी वै.अनुसया भिकोबा देशमुख यांनी त्यांना मोलाची साथ दिली. त्यांचे नंतर हि परंपरा भिकोबा महाराजांचे नातू हे भ प अतुल महाराज देशमुख यांनी सुरु ठेवली आणी पुढील आध्यात्मिक परंपरेच्या वाटचालीसाठी अतुल महाराज यांनी मेढा येथे विश्वंभरबाबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली.

 विश्वभरबाबा आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन तालुक्यातील नव्हे तर जिल्हयातील अनेक विध्यार्थ्यांना अध्यात्माचे धडे देत आहे.अनेक अडचणींवर मात करून याही वर्षी २ डिसेंबर  रोजी गांजे, मामुर्डी, चोरांबे तसेच तालुक्यातील सर्व वारकरी, भाविकांना समवेत घेऊन श्रीविठ्ठल मंदिर मेढा येथून सकाळी १२:३० वा आळंदी च्या दिशेने प्रस्थान करणार आहे.

८ डिसेंबर रोजी श्रीक्षेत्र आळंदी याठिकाणी पोहचणार आहे, तरी सर्व वारकरी भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  विश्वंभर बाबा  दिंडी सोहळ्याचे 

अध्यक्ष बबन आण्णा धनावडे मामुर्डी तसेच नवनिर्वाचित उपाध्यक्ष दत्तात्रय बापू खताळ  मेढा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments