भारतीय राज्यघटनेची मूलतत्वे अंगीकारली पाहिजेत.

 भारतीय राज्यघटनेची मूलतत्वे अंगीकारली पाहिजेत.

--------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

वाई प्रतिनिधी

 कमलेश ढेकाणे

--------------------------------

डॉ. गुरुनाथ फगरे

भारतीय राज्यघटनेत लोकशाहीची तत्वे सांगितली आहेत. आपली राज्यघटना ही जगातील सर्वोत्कृष्ट लिखित राज्यघटना आहे. राज्यघटनेच्या सुरुवातीला उद्देशपत्रिकेत निश्चित उद्दिष्टे व ध्येय दिलेली आहेत. भारतीय राज्यघटनेत न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्वे अंतर्भूत आहेत. घटनेमध्ये आपल्याला आपले हक्क, कर्तव्य व जबाबदाऱ्या सांगितलेल्या आहेत असे प्रतिादन किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांनी केले.

येथील किसन वीर महाविद्यालयातील स्टाफ वेलफेअर समिती व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या भारतीय संविधान दिनानिमित्त प्रमूख मार्गदर्शक म्हणुन ते बोलत होते. याप्रसंगी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्याचबरोबर २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कै. बापूराव धुरगुडे व कै. अंबादास पवार यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी प्रो. डॉ. सुनील सावंत, प्रो. डॉ. विनोद वीर, डॉ. धनंजय निंबाळकर, डॉ. अंबादास सकट, राजेंद्र जायकर यांची विशेष उपस्थिती होती. 

डॉ. फगरे पुढे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेची उद्देशिका ही आपल्या राज्यघटनेचा आत्मा आहे. या उद्देशिकेमध्ये संपूर्ण राज्यघटनेचा सारांश दिलेला आहे. राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये आपल्या राज्यघटनेचा उद्देश, आशय, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट केले आहे. भारतीय राज्यघटना ही जगातील इतर देशांशी तुलना करता सर्वात मोठी व विस्तृत राज्यघटना आहे. आपल्या राज्यघटनेने जनतेच्या सार्वभौमत्वाचा पुरस्कार केलेला आहे. जनतेचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास घडवून आणण्यासाठी अंतिम सत्ता ही जनतेच्याच हाती दिली आहे. राज्यघटना ही आपण स्वतःहून स्वीकारलेली आहे. व तिच्या मूलतत्वांचे  पालन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर  संविधान सभेत आपले विचार मांडताना म्हणाले होते की, राज्यघटनेचे यश अपयश हे राज्यघटनेची अंमलबजावणी करणाऱ्या लोकांवर अवलंबून असते. एवढी उत्कृष्ट राज्यघटना जर चुकीच्या लोकांच्या हातात गेली तर ती कुचकामी ठरेल. त्यामुळे आपण आपली राज्यघटना व लोकशाही अधिक बळकट केली पाहिजे असेही डॉ. गुरूनाथ फगरे म्हणाले. राज्यशास्त्र विभागाचे राजेंद्र जायकर यांनी राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन केले. स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज यादव, विशाल महांगडे, गायकवाड मॅडम, राजाराम सुर्वे, सचिन कुंभार यांनी विशेष प्रयत्न केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रासह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.